AI चे खेळाडूंसाठी खास चष्मे (फोटो सौजन्य - Google Gemini AI)
मेटाने जगप्रसिद्ध स्पोर्ट्सवेअर ब्रँड ओकलीसोबत भागीदारी करून ओकली मेटा एचएसटीएन नावाचे नवीन काळातील एआय स्मार्ट चष्मे लाँच केले आहेत. हे चष्मे विशेषतः खेळाडू आणि क्रीडा प्रेमींसाठी डिझाइन केलेले आहेत. ओकलीच्या मजबूत शैली आणि मेटाच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या या संयोजनामुळे, आता कॅमेरा किंवा मोबाईल न धरता खेळताना आता रेकॉर्डिंग करणेही सहज शक्य होईल. नक्की काय आहे आणि कसे आहे हे तंत्रज्ञान? याचा वापर कसा करता येईल याबाबत आपण या लेखातून अधिक माहिती घेऊया.
उत्कृष्ट समीकरण
Oakley च्या प्रसिद्ध HSTN फ्रेमपासून प्रेरित ओकलीच्या मेटा एचएसटीएन चष्मे हे केवळ स्टायलिश दिसत नाहीत तर त्यात अनेक स्मार्ट वैशिष्ट्ये देखील आहेत जी तुमच्या क्रीडा कामगिरी आणि आरामात आणखी सुधारणा करतात असे सांगण्यात आले आहे. या चष्म्यांमध्ये 3K अल्ट्रा-क्लीअर कॅमेरा आहे जो तुम्हाला हात न वापरता तुम्ही करत असणाऱ्या सर्व क्रिया रेकॉर्ड करू देतो. तसेच, त्याच्या फ्रेममध्ये ओपन-इअर स्पीकर आहेत, ज्यामुळे तुम्ही संगीत, कॉल किंवा पॉडकास्ट ऐकू शकता आणि तेदेखील इअरफोन न घालता, आहे की नाही फायदेशीर?
इनबिल्ट Meta AI कडून स्मार्ट सपोर्ट
या चष्म्यांमध्ये मेटा एआय तंत्रज्ञान इनबिल्ट आहे, जे तुम्हाला रिअल टाइममध्ये मदत करते. जसे की गोल्फ खेळताना किंवा सोशल मीडियावर फक्त आवाजाने व्हिडिओ पोस्ट करताना वाऱ्याची दिशा जाणून घेणे सर्वकाही सोपे आहे. हे चष्मे IPX4 वॉटर रेझिस्टंट आहेत, म्हणजेच घाम, पाऊस किंवा स्प्लॅशचा त्यांच्यावर परिणाम होत नाही.
बॅटरी आणि चार्जिंग
ओकली मेटा एचएसटीएन चष्म्यांची बॅटरी एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यावर ८ तास टिकते. जर तुम्हाला घाई असेल, तर फक्त २० मिनिटे चार्जिंग केल्याने सुमारे ५०% बॅटरी मिळते. त्यांच्यासोबत येणारा चार्जिंग केस तुम्हाला ४८ तासांचा अतिरिक्त बॅकअप देतो, याचा अर्थ तुम्ही ते न थांबता बराच काळ वापरू शकता.
किंमत काय आहे
ही मर्यादित आवृत्ती असून ओकली मेटा एचएसटीएन चष्मे ११ जुलैपासून प्री-ऑर्डरसाठी $499 (सुमारे ₹43,200) किमतीत उपलब्ध असतील. यानंतर, उन्हाळ्याच्या अखेरीस आणखी एक प्रकार लाँच केला जाईल, ज्याची किंमत $399 (सुमारे ₹34,600) पासून सुरू होईल.
सुरुवातीला, हे चष्मे अमेरिका, कॅनडा, यूके, फ्रान्स, जर्मनी आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये उपलब्ध असतील. त्यांची विक्री वर्षाच्या अखेरीस भारत, मेक्सिको आणि युएईमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. हे लाँचिंग मेटाच्या मिशनचा एक भाग आहे ज्यामध्ये ते दैनंदिन गोष्टींमध्ये एआय तंत्रज्ञानाचा समावेश करू इच्छिते.