Twitter च्या फाउंडरने 19 वर्षांपूर्वी केलं होतं पहिलं द्वीट! पहिल्या पोस्टमध्ये काय लिहीलं? जाणून घ्या सविस्तर
14 एप्रिल 2022 रोजी एलन मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी केली. त्यानंतर मस्कने या प्लॅटफॉर्मचे नाव बदलून एक्स असं केलं. शिवाय प्लॅटफॉर्मचा लोगो देखील बदलण्यात आला. मस्कने ट्विटरचा लोगो बदलून त्याजागी एक्स लोगो लावला. नुकत्याच पार पडलेल्या एका लिलावात ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो विकण्यात आला. ही सर्व कथा जरी तुम्हाला माहिती असली, तरी आता प्रश्न असा आहे की, ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला मस्कने खरेदी केलं त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?
जॅक डोर्सी यांनी 2006 मध्ये बिझ स्टोन आणि इव्हान विल्यम्स यांच्यासोबत ट्विटरची स्थापना केली. पॉडकास्टिंग कंपनी ओडिओ येथे झालेल्या विचारमंथन सत्रादरम्यान त्यांना ट्विटरची संकल्पना सुचली. सुरुवातीला ट्विटर हे एसएमएस-आधारित मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म होते, ज्यामध्ये युजर्स त्यांचे विचार 140 शब्दांत व्यक्त करू शकत होते. त्या वेळी ही कल्पना नवीन होती, कारण लोक त्यांचे छोटेसे अपडेट्स जगासोबत त्वरित शेअर करू शकत होते. ‘ट्विटर’ हे नाव पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रेरित झाले आहे, जे लहान आणि जलद संदेशांचे प्रतीक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सुरुवातीच्या काळात ट्विटरला फारशी लोकप्रियता मिळाली नाही, परंतु 2007 मध्ये साउथ बाय साउथवेस्ट (SXSW) परिषदेदरम्यान या प्लॅटफॉर्मने लोकांचे लक्ष वेधले. तिथे, त्याच्या लाईव्ह स्क्रीन डिस्प्लेने युजर्सना आकर्षित केले आणि यानंतर सुरु झाला ट्विटरचा खरा खेळ. बघता बघता ट्विटर लोकांच्या मनावर राज्य करू लागले. 2010 पर्यंत, ट्विटर एक जागतिक व्यासपीठ बनले होते जिथे लोक बातम्या, दृश्ये आणि ट्रेंड शेअर करू लागले.
ज्या प्रकारे युजर्सच्या संख्येत वाढ होत गेली. ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यात आले. त्याचे फीचर्स अधिक सुधारण्यात आले. शब्दांची मर्यादा वाढवण्यात आली. याव्यतिरिक्त, हॅशटॅग, रिट्वीट आणि उल्लेख यासारख्या वैशिष्ट्यांमुळे ते अधिक परस्परसंवादी बनले. यानंतर एंट्री झाली मस्कची. मस्कच्या अधिग्रहणानंतर ट्विटरचे नाव बदलून X करण्याचा आणि त्याचा ब्लू बर्ड लोगो काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. खरं तर हा निर्णय प्रचंड वादग्रस्त होता. मात्र मस्कने तो खरा केला.
ट्विटरवरील पहिले ट्विट त्याचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी 21 मार्च 2006 रोजी पोस्ट केले होते. यामध्ये त्यांनी लिहिले होते, ‘फक्त माझे ट्विटर सेट करत आहे’. हे ट्विट 2021 मध्ये डिजिटल मालमत्ता म्हणून लिलाव करण्यात आले. मलेशियन उद्योगपती सिना एस्तावी यांनी ते 24 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याने त्याची तुलना प्रसिद्ध मोनालिसा चित्राशी केली. जॅक डोर्सी यांनी लिलावातून मिळालेली संपूर्ण रक्कम बिटकॉइनमध्ये रूपांतरित केली आणि ती आफ्रिकेतील गरजूंना मदत करण्यासाठी दान केली. 2022 मध्ये, एलोन मस्कने ट्विटर 3.82 लाख कोटी रुपयांना विकत घेतले.