Twitter Logo Auction: 'निळी चिमणी' अखेर उडालीच... ब्लू बर्ड लोगोसाठी तब्बल इतकी लागली बोली, किंमत वाचून व्हाल थक्क
जगप्रसिद्ध असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो अखेर लिलावात विकला गेला आहे. एलन मस्कने एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खरेदी करण्यापूर्वी त्याचं नाव ट्विटर आणि त्याचा लोगो ब्ल्यू बर्ड असा होता. मस्कने हे प्लॅटफॉर्म खेरदी केल्यानंतर त्याचं नाव आणि लोगो बदलण्यात आला. त्यामुळे आता या प्लॅटफॉर्मच्या जुन्या लोगोचा लिलाव करण्यात आला आहे. ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो RR ऑक्शनमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आला होता.
या निळ्या पक्ष्याचा लिलाव 34 हजार 375 डॉलर्स म्हणजेच सुमारे 30 लाख रुपयांना झाला. लिलाव कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुमारे 254 किलो वजनाचा आणि 12 फूट लांब आणि 9 फूट रुंद असलेल्या या निळ्या पक्ष्याच्या लोगोच्या खरेदीदाराची ओळख उघड करण्यात आलेली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
एलन मस्कने प्लॅटफॉर्म खरेदी केल्यानंतर कंपनीच्या मागील सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयातून प्रतिष्ठित ब्लू बर्ड लोगो काढून टाकण्यात आला आणि त्याचे नाव बदलून X ठेवण्यात आले. 12 फूट लांब आणि 9 फूट रुंद असा हा 254 किलो वजनाचा लोगो 34,375 डॉलरमध्ये विकला गेला. हे आरआर ऑक्शनने सांगितले. ही कंपनी ‘दुर्मिळ आणि संग्रहणीय वस्तू’ मध्ये व्यवहार करते.
टेस्लाच्या सीईओने 2022 मध्ये एक्स, ज्याचे पूर्वी नाव ट्विटर होते, हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 44 अब्ज डॉलर्सना विकत घेतला. मस्कचे ध्येय ट्विटरला ‘एवरीथिंग अॅप’ बनवणे होते, जसे ते म्हणत होते, जे ट्विटरला जेव्हा एक्समध्ये बदलण्यात आले, तेव्हा त्यामध्ये अनेक बदल दिसून आले. त्यांनी 2023 मध्ये एका पोस्टमध्ये घोषणा केली की कंपनी लवकरच ‘ट्विटर ब्रँडला निरोप देईल आणि हळूहळू सर्व पक्षी नष्ट होतील.’ आता असंच होताना पाहायला मिळत आहे. त्यांची ही पोस्ट आता खरी होत असल्याचं आपण पाहू शकतो. टेस्लाच्या सीईओंना ‘X’ हे अक्षर खूप पूर्वीपासून आकर्षित करत आहे. ‘विश्वाचे खरे स्वरूप समजून घेणे’ या महत्त्वाकांक्षी ध्येयासह मस्कने xAI नावाचा एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप देखील सुरू केला.
ज्या बोली प्रक्रियेत ब्लू बर्डचा लिलाव करण्यात आला, त्यात Apple-1 संगणक सुमारे 3.22 कोटी रुपयांना (3.75 लाख डॉलर्स) विकला गेला आणि स्टील जॉब्सने स्वाक्षरी केलेला Apple चेक सुमारे 96.3 लाख रुपयांना (1,12,054 डॉलर्स) विकला गेला. पहिल्या पिढीतील 4 जीबी आयफोन, जो सीलबंद पॅक होता, तो 87 हजार 514 डॉलर्सना विकला गेला.
ब्लूमबर्गने फेब्रुवारीमध्ये दिलेल्या वृत्तानुसार, एक्स सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांकडून 44 अब्ज डॉलर्स उभारण्यासाठी चर्चा करत आहे. मस्कने यापूर्वी लिलावासाठी ठेवलेल्या ट्विटरच्या इतर वस्तूंमध्ये लोगो, स्मृतिचिन्हे आणि ऑफिस फर्निचर आणि स्वयंपाकघरातील वस्तू यासारख्या इतर सामान्य वस्तूंचा समावेश होता. तंत्रज्ञानाच्या इतिहासाशी संबंधित अनेक वस्तू लिलावात उच्च किमतीत विकल्या गेल्या.