
iPhone 17 Pro Max चा Cosmic Orange मॉडेल बदलतोय रंग? युजर्स झाले चकित, खरं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का
Apple अलीकडेच त्यांची आयफोन 17 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमधील iPhone 17 Pro Max हे मॉडेल कंपनीने भगव्या रंगात म्हणजेच Cosmic Orange रंगात लाँच केले होते. कंपनीने पहिल्यांदाच अशा रंगात त्यांचा आयफोन लाँच केला आहे. जेव्हा कंपनीने हे मॉडेल लाँच केले, तेव्हा या रंगाबाबत युजर्समध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र आता या मॉडेलबाबत एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. सध्या सोशल मीडियावर iPhone 17 Pro Max बाबत अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. या पोस्टमध्ये iPhone 17 Pro Max चा भगव्या रंगाचा मॉडेल गुलाबी रंगात बदलल्याचे दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर iPhone 17 Pro Max चे पिंक वर्जन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कंपनीने कोणता नवीन रंगाचे मॉडेल लाँच केले आहे,भगव्या रंगाचे मॉडेल गुलाबी कसे झाले, फिल्टरचा वापर करण्यात आला आहे का, असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर सत्य समोर आलं. कंपनाीने या आयफोनचे कोणतेही नवीन वर्जन लाँच केले नाही तसेच फोटोमध्ये कोणत्या फील्टरचा वापर देखील केलेला नाही. या व्हायरल पोस्टमागील नेमकं सत्य काय आहे, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Orange iPhone 17 Pro Max turning pink. pic.twitter.com/6CNbS7te6s — I Hate Apple (@iHateApplee) October 14, 2025
एका युजरने Reddit वर पोस्ट शेअर करत या संपूर्णप्रकारणाची माहिती दिल आहे. यावेळी युजरने त्याच्या iPhone 17 Pro Max Cosmic मॉडेलचा एक फोटो देखील शेअर केला, ज्यामध्ये फोनच्या मेटल फ्रेमवर हल्का गुलाबी (पिंक) शेड पाहायला मिळत होता. काही क्षणातच हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. या पोस्टवर काही युजर्सनी कमेंट केली आहे की, Apple ने कोणता नवीन पिंक एडीशन लाँच केला आहे का? तर दुसऱ्याने विचारले आहे की, फोटोशॉप किंवा लाइटिंगचा वापर करण्यात आला आहे. मात्र यामागील खरं कारण काही वेगळंच आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांनंतर आता अखेर या पोस्टमागील खरं कारण सांगण्यात आलं आहे. टेक वेबसाइट्सने शेअर केलेल्या रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं आहे की, हा कोणताही नवीन रंग नाही तर हे एक केमिकल रिएक्शन आहे. खरं तर, iPhone 17 Pro Max चे फ्रेम anodised aluminum द्वारे तयार करण्यात आले आहे.
iPhone 17 Pro Max च्या फ्रेममधील हे मेटल टिकाऊ आहे, मात्र त्याच्या पृष्ठभागावर एक पातळ ऑक्साईड थर असतो जो विशिष्ट रसायनांच्या संपर्कात आल्यावर रंग बदलू शकतो. काही युजर्सनी फोन स्वच्छ करण्यासाठी हाइड्रोजन पेरॉक्साइड किंवा ब्लीचवाले क्लीनरचा वापर केला. ज्यामुळे या रासायनिक थराने प्रतिक्रिया दिली. याच कारणामुळे फोनची मेटलिक साइड गुलाबी दिसू लागली, तर मागील काचेच्या पॅनेलचा मूळ “केशरी” रंग कायम राहिला. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, “गुलाबी आयफोन” चा जन्म Apple च्या डिझाइन अपडेटमधून झाला नाही, तर यूजर्सच्या स्वच्छतेच्या प्रयोगांमधून झाला.