Garmin Venu X1: Garmin च्या नव्या स्मार्टवॉचची भारतात एंट्री, फिटनेस लवर्ससाठी ठरणार वरदान! जाणून घ्या किंमत
Garmin Venu X1 भारतात लाँच करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने हे वॉच ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केले होते. त्यानंतर आता कंपनीने हे प्रिमियम स्मार्चवॉच भारतात देखील लाँच केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट वेरिएबिलिटी (HRV), ब्लड ऑक्सीजन लेवल (SpO2), स्ट्रेस ट्रॅकिंग आणि स्लीप एनालिसिस सारखे अनेक हेल्थ मॉनिटरिंग टूल समाविष्ट आहेत. Garmin चं असं म्हणणं आहे की, Venu X1 एकदा चार्ज केल्यानंतर स्मार्टवॉच मोडमध्ये 8 दिवस चालते. हे वियरेबल 100 हून अधिक प्रीलोडेड स्पोर्ट्स अॅप्सना सपोर्ट करते.
नवीन Garmin Venu X1 ची किंमत भारतात 97,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हे ब्लॅक आणि मॉस कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. भारतात याची विक्री Garmin इंडियाची वेबसाइट आणि Amazon द्वारे केली जाणार आहे. (फोटो सौजन्य – X)
नवीन Garmin Venu X1 मध्ये 2-इंच (448×486 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये ऑलवेज-ऑन मोड ऑप्शन उपलब्ध आहे. 8mm चेसिसमध्ये स्क्रॅच-रेसिस्टेंट सॅफायर लेंस लावला आहे. यामध्ये टाइटेनियम केसबॅक आणि नायलॉन बँड आहे. यामध्ये इनबिल्ट स्पीकर आणि माइक्रोफोन देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे युजर्स पेयर्ड स्मार्टफोनद्वारे मनगटातूनच कॉल करू शकतात. यूजर्स व्हॉईस कमांडद्वारे देखील अनेक फंक्शन कंट्रोल करू शकतात.
स्पोर्ट्स लवर्ससाठी, Garmin Venu X1 मध्ये 100 हून अधिक प्रीलोडेड स्पोर्ट्स अॅप्स देण्यात आले आहे. ज्यामध्ये रनिंग, गोल्फ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समावेश आहे. वियरेबलमध्ये Garmin Coach प्लॅन देखील देण्यात आला आहे, जो रनिंग, स्ट्रेंथ आणि साइक्लिंगसाठी फिटनेस गोल तयार करण्यासाठी मदत करतो. पेयरिंगसाठी या डिव्हाईसमध्ये Bluetooth, ANT+, आणि Wi-Fi कनेक्टिविटी देण्यात आली आहे. यामध्ये 32GB स्टोरेज मिळते. याशिवाय या डिव्हाईसमध्ये जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस आणि बेईडू सपोर्ट देखील आहे. यामध्ये LED फ्लॅशलाइट देखील आहे.
Apple च्या लेटेस्ट MacBook Pro आणि iPad Pro ची विक्री झाली सुरु, किंमत आणि स्पेशल ऑफर तपासा
Garmin Venu X1 मध्ये Garmin चा Elevate रिस्ट हार्ट रेट मॉनिटर आणि Pulse Ox ब्लड ऑक्सीजन मॉनिटर समाविष्ट आहे. ज्यामुळे हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सीजन लेवल ट्रॅक केले जाऊ शकते. वियरेबलमध्ये बारोमेट्रिक अल्टीमीटर सेंसर, कंपास, जाइरोस्कोप, एक्सेलेरोमीटर, थर्मामीटर आणि एम्बिएंट लाइट सेंसर देखील देण्यात आला आहे. हे घड्याळ महिलांच्या आरोग्याचा मागोवा घेणे आणि हायड्रेशन लॉगिंगला देखील समर्थन देते. या स्मार्टवॉचमध्ये इनबिल्ट मॅप्स आणि लाइव लोकेशन शेयरिंग फीचर देण्यात आले आहे. हे आयफोन आणि अँड्रॉईड दोन्हींसोबत पेअर केले जाऊ शकते. Garmin Venu X1 मध्ये Garmin चे बॉडी बॅटरी एनर्जी मॉनिटरिंग फीचर देण्यात आले आहे, जे यूजर्सना त्यांची एनर्जी लेवल्स ट्रॅक करण्यासाठी मदत करतो. स्मार्टवॉच मोडमध्ये Garmin Venu X1 ची बॅटरी 8 दिवसांपर्यंत चालते असा दावा करण्यात आला आहे.






