Tech Tips: स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ तपासणं आता झालं आणखी सोपं! Android यूजर्स आत्ताच फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस
टेक जॉयंट कंपनी Apple त्यांच्या आयफोन युजर्सना एक खास फीचर ऑफर करतो. कंपनीचे हे खास फिचर म्हणजे फोनची बॅटरी हेल्थ चेक करणे. आयफोन युजर्स कोणत्याही थर्ड पार्टी अॅपचा वापर न करता त्यांच्या आयफोनची बॅटरी हेल्थ चेक करू शकतात. या फिचरच्या मदतीने युजर्स अगदी सहज समजू शकतात की त्यांच्या स्मार्टफोनची बॅटरी किती चांगली आहे किंवा किती कमजोर आहे. याशिवाय फोनची बॅटरी बदलण्याची गरज आहे की नाही हे देखील या फिचरद्वारे समजते. त्यामुळे कंपनी ऑफर करत असलेले हे फीचर युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. कारण हे फीचर यूजर्सना त्यांच्या आयफोनच्या बॅटरीबाबत सतत अपडेट्स देते.
जेव्हा अँड्रॉइड युजर्सचा विचार केला जातो तेव्हा त्यांना हे फीचर ऑफर केले जात नाही. आयफोनप्रमाणे अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये यूजर्सना हे फीचर डिफॉल्ट स्वरूपात मिळत नाही. त्यामुळे अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये बॅटरी हेल्थ कशी चेक करावी हा प्रश्न अगदी सर्व युजर्सना पडलेला असतो. यासाठी आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ कशी चेक करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये बॅटरी हेल्थ चेक करण्यासाठी तुम्ही एका खास अॅपचा वापर करू शक ता. या ॲपच्या मदतीने अगदी काही मिनिटातच स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ तपासली जाऊ शकते. तुम्ही हे ॲप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून तुमच्या फोनच्या बॅटरीबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोनचा वापर करत आहात आणि तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ तपासायची आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये AccuBattery नावाचे ॲप इन्स्टॉल करून तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी तपासू शकता. तुम्ही प्ले स्टोअरवरून हे ॲप अगदी फ्रीमध्ये इन्स्टॉल करू शकता आणि तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरी हेल्थबद्दल रिअल टाईम अपडेट्स मिळवू शकता.
तज्ञांनी असं सांगितलं आहे की जर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ 80 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर ती बदलणं आवश्यक आहे. तथापि, जर डिव्हाइस एका चार्जवर पूर्ण दिवस चालले तर बॅटरी बदलण्याची गरज नाही. तथापि, जर बॅटरी बॅकअप कमकुवत असेल तर तुम्ही बॅटरी बदलण्याचा विचार करावा.






