हॅकर्सचा मोठा डाव! टाटा मोटर्सच्या या कंपनीवर सर्वात सायबर अटॅक, सिस्टम केली हॅक; ठप्प झाली सर्व कामं
गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे. अवघड कामं अगदी सोपी झाली आहेत. इंटरनेटच्या या जागात प्रत्येक क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे. या प्रगती सोबतच सायबर गुन्ह्यांची संख्या देखील वाढली आहे. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी नवीन पद्धती शोधत आहेत. अगदी सर्व सामान्यांपासून मोठ्या कंपन्यापर्यंत सर्वचजण अगदी सहज हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात. सध्याच्या काळात सायबर गुन्ह्यांची संख्या वेगाने वाढत आहे. सायबर गुन्हेगार अगदी सहज मोठ्या कंपन्यांवर सायबर अटॅक करत आहेत आणि कंपनीमधील सर्व माहिती हॅक करत आहेत. आता देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे.
अलीकडेच सायबर गुन्हेगारांनी टाटा मोटर्सच्या मालकीची UK-बेस्ड कंपनी लँड रोवरची महत्त्वाची सिस्टम हॅक केली आहे. यामुळे कंपनीची आयटी सिस्टीम ऑफलाइन झाली आणि याचा परिणाम कंपनीच्या उत्पादनावर तसेच विक्रीवर झाला. यामुळे कंपनीला मोठा धक्का बसला आहे. आता सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात टाटा मोटर्स देखील अडकले आहे. सायबर गुन्ह्यांच्या या वाढत्या घटनांमध्ये आता टाटा मोटर्सचा देखील समावेश झाला आहे. कंपनीवर करण्यात आलेल्या या सायबर अटॅकचा मोठा परिणाम झाला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, UK-बेस्ड कंपनी लँड रोवरच्या सिस्टमवर करण्यात आलेल्या या सायबर अटॅकच्यामागे Scattered Lapsus$ Hunters नावाच्या ग्रुपचा हात आहे. असं सांगितलं जात आहे की, या ग्रुपने यापूर्वी Marks and Spencer वर देखील सायबर अटॅक केला होता. रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा इंग्रजी बोलणाऱ्या किशोरांचा एक ग्रुप आहे. या ग्रुपने कंपनीच्या नेटवर्कचा एक्सेस मिळवण्यासाठी सहमती दर्शविली आहे.
परंतु कंपनीचा डेटा चोरण्याबद्दल आणि मालवेअर इंस्टॉल करण्याबद्दल या ग्रुपने कोणतीही माहिती दिली नाही. त्यांनी केलेल्या या दाव्याची पुष्टी करण्यासाठी, हॅकर्स गटाने दोन स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत. स्क्रीनशॉटच्या आधारे, तज्ज्ञांनी सांगितले की हॅकर्सना कंपनीची काही खाजगी माहिती मिळाली आहे. त्यामुळे या हॅकिंग अटॅकचा कंपनीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. तसेच या घटनेमुळे कंपनीचं मोठं नुकसान होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंपनीवर या सायबर अटॅकचा काय परिणाम झाला आहे, याबाबत आता जाणून घेऊया.
IT सिस्टम हॅक झाल्यामुळे कंपनीच्या अनेक फॅक्ट्रयांमध्ये प्रोडक्शन थांबले होते. एवढचं नाही तर या सायबर अटॅकमुळे कार सेल नेटवर्कवर देखील परिणाम झाला आहे. या हल्ल्यानंतर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येण्याचे आदेश दिले. ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. या सायबर हल्ल्याची चौकशी करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली आहे. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही जग्वार लँड रोव्हरच्या सायबर सुरक्षेचे काम पाहते. 2023 मध्ये दोन्ही कंपन्यांमध्ये याबाबत 5 वर्षांचा करार झाला होता.