DeepSeek ने पुन्हा एकदा ChatGPT ला टाकलं मागे, भारतातही ठरला लोकप्रिय! वाचा सविस्तर
एका रात्रीत लोकप्रिय झालेल्या DeepSeek ची क्रेझ अजूनही लोकांमध्ये कायम आहे. जगातील पहिला चॅटबोट चॅटजीपीटीला देखील DeepSeek ने मागे टाकलं आहे. डीपसीक जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणारे AI टूल बनलं आहे. AI टूल डीपसीकने लोकांमध्ये एक वेगळी क्रेझ निर्माण केली आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या एका आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2025 मध्ये एका चिनी AI स्टार्टअपच्या चॅटबॉट इंटरफेसला 52.47 कोटी नवीन भेटी नोंदवल्या गेल्या. यामुळे DeepSeek ओपनएआयच्या ChatGPT पेक्षा पुढे आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
डीपसीकाच्या एआय चॅटबोट वेबसाइटला भेट देणाऱ्यांची एकूण संख्या 79.2 करोड होती, त्यापैकी 13.65 करोड अद्वितीय युजर्स होते. दरमहा 4.3 करोड भेटीसह डीपसीकवरील जागतिक ट्रॅफिकमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. यावरून स्पष्ट होते की, डीपसीकवर येणाऱ्या नवीन लोकांची संख्या चॅटजीपीटीपेक्षा जास्त आहे. डीपसीक भारतातील लोकांनाही आकर्षित करत आहे. AI मार्केट डिस्ट्रिब्यूशनमध्ये डीपसीक अजूनही तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत, ChatGPT पहिल्या स्थानावर आहे आणि Canva दुसऱ्या स्थानावर आहे. जर आपण चॅटबॉट श्रेणीबद्दल बोललो तर, चॅटजीपीटी या यादीत शीर्षस्थानी आहे आणि डीपसीक दुसऱ्या स्थानावर आहे. म्हणजेच लोकांमध्ये DeepSeek ची क्रेझ कमी होत नाही.
फेब्रुवारीमध्ये, डीपसीकच्या वेबसाइटला भारतातून 43 दशलक्षाहून अधिक भेटी मिळाल्या. अशाप्रकारे, डिपसीकच्या वाहतुकीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, गेल्या महिन्यात एआय उद्योगात एकूण 12 अब्जाहून अधिक भेटी नोंदवल्या गेल्या. चिनी स्टार्टअप डीपसीकने कमी किमतीचे एआय मॉडेल सादर करून जगभरात खळबळ उडवून दिली. यामुळे अनेक अमेरिकन कंपन्यांचे शेअर्स घसरले होते आणि एआय शर्यतीत अमेरिकेपेक्षा मागे असलेला चीन पुन्हा पुढे आला होता. आता अनेक चिनी कंपन्यांनी त्यांचे एआय मॉडेल्स लाँच केले आहेत.
चॅटजीपीटी आणि डिपसीकमधील स्पर्धा गेल्या काही दिवसांपासून तीव्र झाली आहे. चॅटजीपीटीला मागे टाकण्यासाठी डिपसिक पूर्णपणे प्रयत्न करत आहे. काही महिन्यांपूर्वी डिपसिक आणि चॅटजीपीटीमधील वाद वाढला होता. डिपसिकवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे अनेक देशांनी डिपसिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
डिपसिक युजर्सची माहिती चिनी कंपनीला देते, असा आरोप करण्यात आला होता. मात्र या आरोपांमुळे डिपसिकच्या युजर्सची संख्या कमी झाली नाही, तर युजर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. केवळ इतर देशांमध्येच नाही तर चीनमध्येच डिपसिकसाठी अनेक प्रतिस्पर्धी तयार झाले. मात्र या सर्व प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देत आता डिपसिकने पुन्हा नवीन यश गाठलं आहे.