Telegram युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता तुम्हीही करू शकता GrokAI चा वापर, पण पूर्ण करावी लागणार Elon Musk ची 'ही' अट
AI कोणत्याही गोष्टीची अगदी सहज नक्कल करू शकतो. शिवाय AI तुम्हाला कोणत्या विषयावरील माहिती शेअर करू शकतो आणि ईमेज देखील तयार करून देऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर सध्या असं कोणतंही काम शिल्लक नाही जे AI करू शकत नाही. तुम्हाला जे काय करायचं आहे, त्यासंबंधीत प्रॉम्प्ट तुम्हाला AI वर द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर AI त्याच्या कामाला सुरुवात करतो. गुगल, ओपनएआय, मायक्रोसॉफ्ट अशा सर्व दिग्गज टेक कंपन्यांनी त्यांचे स्वत:चे AI चॅटबोट विकसित केलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील हे AI चॅटबोट जोडण्यात आले आहेत.
ChatGPT चा वापर न करताही तयार करू शकता Ghibli-Style ईमेज, Grok AI सह हे टूल्स करणार तुमची मदत
इंस्टाग्राम, फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर मेटा AI जोडण्यात आला आहे. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ग्रोक जोडण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सनंतर आता टेलिग्रामवर देखील AI चॅटबोट ग्रोक जोडण्यात आलं आहे. याबाबत मस्कने घोषणा केली आहे. त्यामुळे आता इतर सोशल मीडिया युजर्सप्रमाणेच टेलिग्राम युजर्स देखील ग्रोकचा वापर करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
बहुतेक लोक एलोन मस्कचे ग्रोक एआय वापरत आहेत. या AI टूलच्या मदतीने फोटो तयार करता येतात. तसेच, कोणत्याही विषयावर माहिती मिळवणे सोपे आहे. अगदी कमी काळात एलोन मस्कच्या ग्रोकने इतर AI चॅटबोटना टक्कर दिली आहे आणि त्यामुळे ग्रोकच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढती मागणी पाहता आता हे AI चॅटबोट टेलिग्रामवर जोडण्यात आलं आहे.
एक्स युजर्सव्यतिरिक्त, टेलिग्राम युजर्स देखील ग्रोक वापरू शकणार आहेत. याबाबतची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. ग्रोक AI ची पोहोच शक्य तितकी वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे देण्यात आली आहे.
“ग्रोक आता थेट टेलिग्रामवर उपलब्ध आहे,” असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करण्यात आली आहे. पण यासाठी एक अट देखील ठेवण्यात आली आहे. या अटीमुळे बहुतेक युजर्स टेलिग्रामवर ग्रोक वापरू शकणार नाहीत. टेलिग्रामवर ग्रोक वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील. म्हणजेच ही सेवा फक्त टेलिग्राम प्रीमियम आणि एक्स-प्रीमियम युजर्ससाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळे बहुतेक युजर्स ही सेवा वापरणार नाहीत असे म्हटले जात आहे.
grok now available directly on @telegram
— Grok (@grok) March 26, 2025
असा अंदाजही लावला जात आहे की काही काळानंतर, एलोन मस्क प्रीमियम युजर्सव्यतिरिक्त सर्व युजर्ससाठी ही सेवा सुरू करू शकतात. तथापि, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, प्रीमियम युजर्स टेलिग्रामवर “GrokAI” सर्च करून आणि चॅट सुरू करून Grok वापरू शकतात. टेलिग्रामच्या मते, ग्रोकचे नवीनतम मॉडेल म्हणजेच ग्रोक 3 टेलिग्राममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.