Tech Tips: तुम्हीही युट्यूबर आहात? सोशल मीडियावरून कमाई करताय? चुकूनही करू नका या चूका? नाहीतर होईल मोठं नुकसान
युट्यूब चॅनेलद्वारे हल्ली लोकं मोठ्या प्रमाणात कमाई करतात. युट्यूबवर अपलोड केले जाणारे व्हिडीओ युजर्ससाठी कमाईचा एक नवा मार्ग आहे. असे अनेक लोकं आहेत, ज्यांनी नोकरी सोडून युट्यूब चॅनेल सुरु केला आहे. हे लोकं आज त्यांच्या पगारापेक्षा देखील मोठी कमाई करत आहेत. युट्यूबद्वारे कमाई करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा चॅनेल आणि तुम्ही अपलोड करत असलेले व्हिडीओ. या दोन्ही गोष्टी युट्यूब कमाईसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. युट्यूबर्स सोशल मीडियावरून कमाई करण्यासाठी प्रचंड मेहनत करतात. पण अशा काही गोष्टी असतात, ज्यामुळे तुमच्या सोशल मीडियावरील कमाईला ब्रेक लागू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)