Flipkart Big Billion Days Sale 2025: काय आहे Flipkart चा Pre-Reserve Pass? सेलमध्ये स्वस्त iPhone खरेदी करण्यासाठी होईल मदत
येत्या काही दिवसांत म्हणजेच 23 सप्टेंबरपासून Flipkart Big Billion Days Sale सुरु होणार आहे. कंपनीने या सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनपासून कपड्यांपर्यंत अनेक वस्तू कमी किंमतीत आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सेलसाठी ग्राहक प्रचंड उत्सुक आहेत. विशेष म्हणजे ज्यांना आयफोन खरेदी करायचा आहे, असे ग्राहक या सेलची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत.
अहो भूत नाही हा तर आहे रोबोट! पाणी पितो आणि माणसांची ‘ही’ कामही करतो, मोटार आणि बॅटरीचीही गरज नाही….
फ्लिपकार्ट सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहक प्रचंड उत्सुक आहेत. मात्र अनेकांना एकच भिती आहे, ती म्हणजे खरेदीपूर्वीच आयफोन आउट ऑफ स्टॉक नाही झाले पाहिजे. सेलदरम्यान असं अनेकदा घडतं जेव्हा सेल सुरु झाल्यानंतर अगदी काही वेळातच डिव्हाईस आउट ऑफ स्टॉक होतात. त्यामुळे बऱ्याच लोकांना हे डिव्हाईस खरेदी करण्याची संधीच मिळत नाही. आयफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बाबतीत देखील बऱ्याचदा असं घडतं. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्लिपकार्ट ग्राहकांच्या या समस्येवर समाधान घेऊन आली आहे. कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी यावेळी खास Pre-Reserve Pass घेऊन आली आहे. Pre-Reserve Pass च्या मदतीने ग्राहक ऑफर्स आणि डिस्काऊंटसह आयफोन खरेदी करू शकणार आहेत. हा पास नक्की काय आहे, कशा पद्धतीने काम करतो, याबाबत जाणून घेऊया.
सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर Pre-Reserve Pass म्हणजेच एक एडवांस बुकिंग ऑप्शन आहे. म्हणजेच जर तुम्हाला सेलमध्ये आयफोन खरेदी करायचा असेल तर केवळ 5000 रुपये देऊन तुम्ही यूनिट बुक करू शकता. हा पास म्हणजे या गोष्टीची खात्री आहे की, सेल सुरु झाल्यानंतर आयफोन तुमच्यासाठी स्टॉकमध्ये राहणार आहे.
iPhone मॉडल्ससाठी फ्लिपकार्टद्वारे जारी केला जाणार Pre-Reserve Pass केवळ निवडक iPhone मॉडेल्ससाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये iPhone 16 Pro (128GB), iPhone 16 Pro (256GB) आणि iPhone 16 Pro Max (256GB) मॉडेल यांचा समावेश आहे.
सेलमध्ये कन्फर्म केलेला आयफोन खरेदी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम हा पास मिळविण्यासाठी 5000 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर हा पास तुमच्या आयडीवर सेलच्या पहिल्या 24 तासांसाठी, म्हणजे 22 सप्टेंबर रोजी सक्रिय राहील. तुम्ही कोणत्याही कोडशिवाय थेट या पासशी लिंक केलेला आयफोन ऑर्डर करू शकाल. एवढेच नाही तर तुम्ही एडवांस भरलेले आपको रुपये तुमच्या आयफोनच्या अंतिम किमतीत देखील एडजस्ट केले जातील. याचा अर्थ, एक प्रकारे तुम्हाला हा पास पूर्णपणे मोफत मिळत आहे.