Mera Ration 2.0 app: आता तुमच्या फोनलाच बनवा रेशन कार्ड! आत्ताच डाऊनलोड करा हे सरकारी अॅप आणि मिळवा धमाकेदार फायदे
बदलत्या डिजीटल काळात लोकांचे जीवन अधिक सोपं झालं आहे. नवीन तंत्रज्ञान आणि नवीन अॅप्समुळे आपली अनेक कामं अगदी क्षणार्धात होत आहेत. पूर्वी ज्या कामांसाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत होता, तीच कामं आता क्षणार्धात होत आहे. पूर्वी आपण आपल्या सर्व डॉक्युमेंट्सची फाईल सर्वत्र घेऊन फिरत होतो. मात्र आता हेच सगळे डॉक्युमेंट्स तुमच्या फोनमध्ये उपलब्ध असतात. आता देखील आम्ही तुम्हाला अशाच एका तंत्रज्ञानाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे आता रेशन कार्ड तुमच्या खिशात नाही तर तुमच्या फोनमध्ये असणार आहे.
मेरा राशन 2.0 अॅपच्या मदतीने तुम्ही अनेक काम करू शकणार आहात. जसे रेशन घेणे, डिटेल अपडेट करणे आणि व्यवहार तपासणे, अशी अनेक कामं आता क्षणार्धात अॅपच्या मदतीने केली जाणार आहेत. या सर्व कामांसाठी आता सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही, ही सर्व कामं आता अॅपवर केली जाणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही घरापासून दूर कोणत्या दुसऱ्या शहरात राहत असाल तर हे अॅप तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. आता तुम्ही तुमचे रेशन कोणत्याही दुकानातून घेऊ शकता. याचे कारण असे की हे अॅप संपूर्ण देशातील रेशन सिस्टमला एकत्र जोडते. हे अॅप तुमच्या आधार कार्ड आणि फिंगरप्रिंटसह तुमची माहिती रिअल टाइममध्ये अपडेट करते. यामुळे तुमचे रेशन सर्वत्र मिळवणे सोपे होते, यामुळे तुम्हाला रेशन घेणं अगदी सोपं होणार आहे.
यापूर्वी रेशन घेताना पारदर्शकतेचा अभाव होता, मात्र आता या अॅपच्या मदतीने तुम्हाला कधी, किती आणि कोणत्या दुकानातून रेशन मिळाले आहे, याची माहिती मिळणार आहे. अॅपवर प्रत्येक ट्रांजेक्शन रेकॉर्ड होणार आहे. तुम्हाला अॅपवर आधार कार्ड किंवा रेशन नंबर एंटर करून लॉगिन करावं लागणार आहे. आता तुमच्यासमोर पूर्ण हिशोब ओपन होणार आहे, त्यामुळे कोणतीही शंका राहणार नाही.
जर तुम्हाला रेशन कार्डमध्ये कोणता बदल करायचा असेल, तर हे अॅप तुमची मदत करणार आहे. रेशन कार्डमध्ये नवीन सदस्य जोडणे, मोबाईल नंबर अपडेट करणे किंवा पत्ता बदलणे ही सर्व कामे तुम्ही अॅपपद्वारे स्वतः करू शकता. ज्यामुळे तुम्हाला या कामांसाठी रेशन दुकानावर जाण्याची गरज भासणार नाही. पूर्वी ही कामे करण्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयात जावे लागत असे, पण आता तुम्ही हे सर्व घरी बसून करू शकता. यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे.
जर तुम्ही घरापासून दूर एखाद्या नव्या शहरात राहत असाल तर आणि तुम्हाला त्या ठिकाणी असलेल्या रेशन दुकानांची माहिती नसेल तर हे अॅप तुम्हाला मदत करणार आहे. या अॅपमध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी रेशन दुकानांची माहिती देखील मिळू शकते. याद्वारे तुम्हाला रेशन कुठून मिळवायचे आहे हे सहज कळेल.
या अॅपची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते तुम्हाला रेशनशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती वेळेवर देते. अॅपमध्ये नोटिफिकेशन येत राहतात ज्या तुम्हाला नवीन अपडेट्स, तारखा आणि सुविधांबद्दल माहिती देतात.