तब्बल 10 वर्षांनी बंद होतंय YouTube चं हे सर्वात मोठं फीचर! कंपनीने सांगितलं कारण, जाणून घ्या सविस्तर
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने एक घोषणा केली आहे. कंपनी आता लवकरच प्लॅटफॉर्मवरून टॉप ट्रेंडिंग व्हिडीओ दिसणारे ट्रेडिंग पेज हटवणार आहे. हे फीचर 2015 मध्ये सुरु करण्यात आले होते. मात्र आता तब्बल 10 वर्षांनी हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की, गेल्या 5 वर्षांत पेजवर विजिट्स मोठ्या प्रमामात कमी झाले आहेत. याचं कारण म्हणजे लोकं आता वेगवेगळ्या ठिकाणावरून कंटेट शोधतात. याशिवाय कंपनीने असं देखील सांगितलं आहे की, आता यूजर्स YouTube Charts वर खास कॅटेगरीजमध्ये पॉपुलर व्हिडीओ पाहू शकणार आहेत.
Google च्या YouTube Help पेजवर एका ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म 21 जुलैला ट्रेंडिंग पेज आणि त्यांची ट्रेंडिंग नाउ लिस्ट बंद करणार आहे. हे फीचर 2015 मध्ये युजर्ससाठी रिलीज करण्यात आले होते. Google च्या YouTube Trending Page Help Center ने खुलासा केला आहे की, ट्रेंडिंग पेज 21 जुलैपासून बंद केले जाणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, गेल्या 5 वर्षांत युजर्सच्या व्यवहारामधील बदलामुळे ट्रेंडिंग पेजवर विजिट्स मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. ब्लॉग पोस्टमध्ये अंस सांगण्यात आलं आहे की, आता YouTube वर रेकमेंडेशन्स, सर्च सजेशन्स, शॉर्ट्स, कमेंट्स आणि कम्युनिटीज सारख्या ठिकाणाहून ट्रेंड्सबद्दल माहिती मिळते. (फोटो सौजन्य – Pinterest)
YouTube ने ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं आहे की, आता यूजर्स YouTube Charts वरील खास कॅटेगरीजमध्ये पॉपुलर कंटेंट शोधू शकणार आहेत. सध्या YouTube Charts केवळ YouTube Music साठी उपलब्ध आहे. ब्लॉग पोस्टनुसार, लोकं YouTube Charts वर ट्रेंडिंग म्यूझिक व्हिडीओ, वीकली टॉप पॉडकास्ट शोज आणि ट्रेंडिंग मूवी ट्रेलर्स बघू शकणार आहात. कंपनी भविष्यात चार्टमध्ये अधिक कंटेंट कॅटेगरीज जोडेल. गेमिंग व्हिडिओंसाठी, YouTube गेमिंग एक्सप्लोर पेजवर ट्रेंडिंग व्हिडिओ दाखवत राहील.
YouTube Charts व्यतिरिक्त, कंपनी यूजर्सना पर्सनलाइज्ड व्हिडीओ रेकमेंडेशन्स देखील देणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, यामुळे ते वेगवेगळ्या यूजर्सना “रेंजचा पॉपुलर कंटेंट” दाखवू शकेल. याव्यतिरिक्त, यूजर्स YouTube च्या एक्सप्लोर पेजवर, खास क्रिएटर्सच्या चॅनेलवर आणि त्यांच्या सबस्क्रिप्शन फीडवर नॉन-पर्सनलाइज्ड कंटेंट शोधू शकतात.
क्रिएटर्स ट्रेंडिंग पेजचा वापर त्यांच्या चॅनल्सना प्रमोट करण्यासाठी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपले लेटेस्ट वीडियोजची रॅकिंग पाहण्यासाठी करू शकतात. तसेच, युजर्स नवीनतम ट्रेंड फॉलो करण्यासाठी आणि सर्वाधिक पाहिलेल्या कंटेंटवर आधारित नवीन कंटेंट तयार करण्यासाठी ट्रेंडिंग पेज वापर करू शकता. त्यांच्यासाठी, YouTube स्टुडिओमधील Inspiration टॅब पर्सनलाइज्ड आइडियाज प्रदान करत राहील असे YouTube ने म्हटले आहे.
अलीकडेच, YouTube ने देखील जाहीर केले की ते त्यांचे मॉनेटाइजेशन रूल्स अपडेट करत आहेत. ज्यामुळे मास-प्रोड्यूस्ड कंटेंट आणि इनऑथेंटिक व्हिडीओवर कमाई केली जाऊ शकते. व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपनी इनऑथेंटिक आणि रिपीटेटिव व्हिडिओ ओळखण्यासाठी त्यांची प्रक्रिया सुधारत आहे. नवीन धोरण 15 जुलैपासून लागू होईल.