झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर
रिपोर्ट्सनुसार, WhatsApp ने नवीन फीचर रोलआऊट केल्यानंतर यूजर्स WhatsApp वेबवरून ऑडीओ आणि व्हिडीओ कॉल करू शकणार आहेत. यासाठी त्यांना WhatsApp च्या डेस्कटॉप अॅपची देखील गरज नसेल. यूजर्स थेट ब्राऊझरमधून कॉल करू शकणार आहेत. हे फीचर वन-टू-वनसह ग्रुप कॉल्सला देखील सपोर्ट करणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरु आहे. याबाबत अधिक माहिती जारी करण्यात आली नाही. त्यामुळे हे फीचर यूजर्ससाठी कधी जारी केली जाणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
WhatsApp वेबवर कॉलिंग सपोर्ट रोलआऊट झाल्यानंतर कॉल नोटिफिकेशन बाय डिफॉल्ट इनेबल होणार आहे. यानंतर यूजर्सना ब्राऊझरमध्येच व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलची नोटिफिकेशन मिळणार आहे. जरी यूजर्सची चॅट विंडो बंद असली तरी देखील त्यांना व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलची नोटिफिकेशन मिळणार आहे. नोटिफिकेशन मॅनेज करण्यासाठी यूजर्सना सर्व कंट्रोल दिले जाणार आहेत. जर यूजर्सनी वेब वर्जनवरील सेटिंगध्ये काही बदल केले तर हा बदल मोबाईलसाठी अप्लाय होणार नाही. याचा अर्थ असा आहे की यूजर्स दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी वेगवेगळी सेटिंग निवडू शकणार आहेत.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप अनेक नवीन फीचर्स घेऊन आला आहे. यामध्ये यूजर्ससाठी नवीन स्टिकर पॅक देखील जोडण्यात आला आहे. यामध्ये यूजर्स कोणत्याही झगमगाटाशिवाय त्यांच्या मित्रांना आणि कुटूंबियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे स्टिकर्स पाठवू शकणार आहेत. याशिवाय कंपनीने व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंगसाठी नवीन ईफेक्ट्स देखील रोलआऊट केले आहेत. व्हिडीओ कॉलदरम्यान यावर टॅप करून यूजर्स हे फीचर्स अॅक्सेस करू शकणार आहेत. यामधअये फायरवर्क्स, कन्फेटी आणि स्टार अॅनिमेशन सारख्या ईफेक्ट्सचा समावेश आहे. अॅनिमेटेड कॉन्फेटी रिअॅक्शन देखील परत आल्या आहेत. वापरकर्ते आता अॅनिमेटेड कॉन्फेटीसह संदेशांवर प्रतिक्रिया देऊ शकतील.
Ans: Unknown links, OTP मागणारे मेसेज, पैसे मागणारे कॉल्स म्हणजे स्कॅम असतात.
Ans: 24 तास
Ans: होय, जर Backup ON असेल तर restore करून मिळू शकतो.






