Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

भारतात आता आधुनिक आणि सुरक्षित प्रवास दस्तऐवज प्रणालीकडे मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. भारतात अखेर E-Passport ची सुरुवात झाली आहे. या पासपोर्टसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील अतिशय सोपी आहे. पण यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 27, 2026 | 08:56 AM
भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • भारतात चिपयुक्त ई-पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात झाली असून प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.
  • ई-पासपोर्टमधील डिजिटल चिपमुळे ओळख पडताळणी जलद आणि बनावट पासपोर्ट रोखणे सोपे होईल.
  • नवीन पासपोर्ट किंवा रिन्यूअलसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना ई-पासपोर्ट मिळणार असून शुल्कात कोणतीही वाढ नाही.
भारताने आधुनिक प्रवास दस्तऐवज प्रणालीकडे मोठे पाऊल टाकत चिपयुक्त ई-पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात केली आहे. नवीन ई-पासपोर्टमध्ये डिजिटल सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान ओळख पडताळणी अधिक जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार आहे. ई-पासपोर्टचे बाह्य स्वरूप पारंपरिक पासपोर्टसारखेच राहणार आहे. मात्र त्यामध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे जगभरातील विमानतळांवरील इमिग्रेशन प्रक्रिया अधिक सोपी होण्यास मदत होईल.

टायपिंगची गरज संपली! गुगल क्रोममध्ये येतंय ‘Select From Screen’ AI फीचर… यूजर्सचा अनुभव होणार आणखी मजेदार

ई-पासपोर्ट म्हणजे काय?

ई-पासपोर्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट. यामध्ये सुरक्षित चिप आणि अँटेना बसवलेला असतो. या चिपमध्ये पासपोर्टधारकाची वैयक्तिक माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित साठवली जाते. ही माहिती पासपोर्टच्या पुस्तिकेत छापलेल्या माहितीसारखीच असते, ई-पासपोर्ट ओळखण्यासाठी पासपोर्टच्या पुढील कव्हरवर असलेले छोटे सोनेरी रंगाचे ई-पासपोर्ट चिन्ह पाहता येते. हे चिन्ह पासपोर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप असल्याचे दर्शवते. (फोटो सौजन्य – AI Created)

ई-पासपोर्टमुळे सुरक्षा कशी वाढणार ?

ई-पासपोर्टमुळे ओळख चोरी, बनावट कागदपत्रे आणि पासपोर्टमध्ये फेरफार करण्याच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. पूर्वी केवळ छापील माहितीवर अवलंबून राहावे लागत होते. आता पासपोर्टधारकाची माहिती चिपमध्ये डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहणार आहे. इमिग्रेशन तपासणीवेळी अधिकृत अधिकारी चिपमधील माहिती आणि पासपोर्टवरील माहितीची इलेक्ट्रॉनिक पडताळणी करू शकतील, त्यामुळे बनावट पासपोर्ट वापरणे अधिक कठीण होईल.

ई-पासपोर्टचा वापर कसा करायचा?

ज्या विमानतळांवर ई-पासपोर्ट स्कॅनर किया ऑटोमेटेड ई-गेटची सुविधा उपलब्ध आहे, तेथे प्रवाशांना पासपोर्ट स्कॅनरवर ठेवावा लागेल. चिप इमिग्रेशन प्रणालीशी सुरक्षित संपर्क साधून प्रवाशाची ओळख जलद तपासण्यास मदत करेल.

ई-पासपोर्टसाठी कसा कराल अर्ज?

अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे की, ई-पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा. ई-पासपोर्टसाठी अर्ज करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. जर तुमच्याकडे जुना पासपोर्ट आहे आणि तो व्हॅलिड असेल तर तुम्हाला त्वरित ई-पासपोर्टसाठी अर्ज करण्याची गरज नाही. कारण एक्सपायरी तारीखपर्यंत तुम्ही तुमच्या जुन्या पासपोर्टचा वापर करू शकता. जेव्हा तुम्ही नवीन पासपोर्ट तयार कराल किंवा रिन्यूअलसाठी अर्ज कराल तेव्हा तुम्हाला ई-पासपोर्ट मिळेल.

ई-पासपोर्टसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्वीसारखीच आहे. तुम्हाला पासपोर्ट सेवा पोर्टलवर ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे, त्यानंतर अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि जवळील केंद्रावर कागदपत्रांसह व्हेरिफिकेशन करावे लागेल. आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र आणि पत्त्याचा पुरावा यांसारखी कागदपत्रे अर्ज करण्यासाठी महत्त्वाची असतील. तसेच, अर्जदारांवर कोणताही गंभीर गुन्हेगारी रेकॉर्ड नसणं अत्यंत आवश्यक आहे.

WhatsApp Update: स्कॅमर्सची खैर नाही! अनोळखी नंबरवरून मेसेज येताच यूजर्सना मिळणार इशारा; कसं काम करणार नवं फीचर?

किती फी भरावी लागेल?

ई-पासपोर्ट तयार करण्यासाठी फीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. 36 पृष्ठांच्या सामान्य पासपोर्ट बुकलेटसाठी फी 1500 रुपये आणि 60 पृष्ठांच्या बुकलेटसाठी 2000 रुपये निश्चित आहे. जर तुम्ही तात्काळ सेवेचा पर्याय निवडला तर ही वाढून 36 पृष्ठांसाठी 3500 रुपये आणि 60 पृष्ठांसाठी 4000 रुपये होणार आहे. भारतातील कोणताही नागरिक ई-पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहे.

Web Title: E passport service started in india how can you apply for this follow these steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.