टायपिंगची गरज संपली! गुगल क्रोममध्ये येतंय 'Select From Screen' AI फीचर... यूजर्सचा अनुभव होणार आणखी मजेदार
हे नवीन फीचर यूजर्सना स्क्रीनवरील कंटेट वेगाने सिलेक्ट करून त्याला जेमिनी प्रॉम्प्टमध्ये जोडण्याची सुविधा देतो. टाईप करून माहिती शोधण्याऐवजी यूजर्स त्यांच्या स्क्रीनचा एक भाग निवडू शकतात आणि मदतीसाठी थेट जेमिनीला पाठवू शकतात. ‘सिलेक्ट फ्रॉम स्क्रीन’ टूल क्रोम वर्जन 149 चा एक भाग म्हणून रोलआऊट केले जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
क्रोममध्ये जेमिनीच्या अपडेटेड सपोर्ट पेजवर, कंपनीने नवीन ‘सिलेक्ट फ्रॉम स्क्रीन’ टूलबाबत माहिती शेअर केली आहे. या फीचरचा वापर करण्यासाठी यूजर्सना डेस्कटॉपवर गूगल क्रोममध्ये आस्क जेमिनीवर क्लिक करावे लागणार आहे. तर मोबाईलवर नवीन ‘सिलेक्ट फ्रॉम स्क्रीन’ टूल अगदी सर्कल टू सर्च फीचरप्रमाणेच काम करणार आहे. यूजर्स त्यांच्या स्क्रीनचा एक भाग निवडून त्याबाबत जेमिनीला विचारू शकतात. कंपनीचं असं म्हणणं आहे की, ‘सिलेक्ट फ्रॉम स्क्रीन’ टूल विविध परिस्थितीत फायदेशीर ठरते. जसे, काही स्नीकर्सच्या जोड्या हाइलाइट टाकणे आणि रनिंग स्टाइलसाठी त्यापैकी कोणती जोडी सर्वोत्तम आहे, याबाबत विचारणे. याशिवाय, स्पष्टकरीण मिळवण्यासाठी आकृतीचा काही भाग कॅप्चर करणे, पानाच्या एखाद्या भागाची पुनर्रचना करण्यासाठी तो निवडणे किंवा तुमच्या कल्पनेला नवीन रूप देणे.






