आता WhatsApp मधून होणार कमाई! (Photo Credit- Ai)
मेटाच्या मालकीचे व्हॉट्सॲप एका नवीन मोनेटायझेशन (Monetization) फिचरवर काम करत आहे. या अंतर्गत क्रिएटर्स आपल्या चॅनेलवर ‘पेड सबस्क्रिप्शन’ (Paid Subscription) सुरू करू शकतील. म्हणजेच, जे युजर्स पैसे देऊन सबस्क्रिप्शन घेतील, त्यांनाच क्रिएटर्सचा विशेष (Exclusive) कंटेंट पाहता येईल. सध्या हे फिचर टेस्टिंग आणि डेव्हलपमेंट टप्प्यात असून, लवकरच ते सर्व युजर्ससाठी खुले केले जाण्याची शक्यता आहे. चॅनेलला अधिक ‘क्रिएटर फ्रेंडली’ बनवण्याचा कंपनीचा हा मानस आहे.
या नवीन सुविधेमुळे युजर्सना त्यांच्या आवडीच्या चॅनेलचे सबस्क्रिप्शन घेता येईल. या बदल्यात त्यांना अशा पोस्ट्स पाहायला मिळतील, ज्या सामान्य युजर्ससाठी उपलब्ध नसतील. विशेष म्हणजे, यामध्ये पारदर्शकता राखण्यासाठी व्हॉट्सॲप एका चॅनेलवर किती पेड सबस्क्राइबर्स आहेत, ही संख्या सर्वांना दाखवणार आहे. यामुळे चॅनेलचा कंटेंट किती लोकप्रिय आणि विश्वासार्ह आहे, हे समजणे सोपे जाईल.
व्हॉट्सॲपवर चॅनेल बनवणे अत्यंत सोपे आहे:
1. WhatsApp उघडा आणि Updates किंवा Channels सेक्शनमध्ये जा.
2. प्लस (+) चिन्हावर क्लिक करून ‘Create Channel’ निवडा.
3. Continue वर टॅप करा, चॅनेलचे नाव टाका आणि आवश्यक असल्यास डिस्क्रिप्शन व आयकॉन जोडा.
4. शेवटी ‘Create Channel’ वर क्लिक करा. तुमचे चॅनेल तयार झाल्यानंतर तुम्ही लगेच पोस्ट करणे सुरू करू शकता. चॅनेलचे नाव किंवा माहिती तुम्ही कधीही बदलू शकता.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समधील वाढती स्पर्धा पाहता, व्हॉट्सॲपचे हे नवीन फिचर कंटेंट क्रिएटर्ससाठी रोजगाराची एक मोठी संधी ठरू शकते.






