चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु
तसेच, टेक कंपनीने अद्याप डिव्हाईसचे नाव, लाँच तारीख किंवा फीचर्सबाबत देखील कोणताही खुलासा केला नाही. भारतात हा आगामी स्मार्टफोन iQOO 16R या नावाने लाँच केला जाण्याची शक्यता आहे. तर काही मार्केटमध्ये हा स्मार्टफोन iQOO 16s नावाने देखील सादर केला जाऊ शकतो. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनची लाँच तारीख जाहीर केली नसली तर अशा चर्चा सुरु आहेत की, भारतात हा स्मार्टफोन डिसेंबर महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. तर याची विक्री जानेवारी 2027 मध्ये सुरु होऊ शकते. (फोटो सौजन्य: Pinterest)
BIS लिस्टिंगमध्ये एका नवीन iQOO डिव्हाईसचा ‘I2606’ हा मॉडेल क्रमांक दिसून आला आहे. या डिव्हाईसला 11 नोव्हेंबर रोजी रजिस्ट्रेशन नंबर R-93029700 अंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे. हाच मॉडेल नंबर यापूर्वी IMEI डेटाबेसमध्ये iQOO 16R च्या नावाने देखील स्पॉट करण्यात आला होता. तर मलेशियाच्या SIRIM आणि इंडोनेशियाच्या SDPPI सर्टिफिकेशन वेबसाईटवर iQOO 16s नावाने स्पॉट करण्यात आला आहे. त्यामुळे आता कंपनी हा आगामी स्मार्टफोन भारतात iQOO 16R नावाने लाँच करणार की iQOO 16s नावाने लाँच करणार याबाबत गोंधळ आहे.
कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, iQOO 16R स्मार्टफोन हा चीनमध्ये लाँच होणाऱ्या iQOO Z12 Turbo चे रीब्रँडेड वर्जन असल्याचे सांगितलं जात आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.59 इंच डिस्प्ले पाहायला मिळू शकतो, जो किमान 165Hz रिफ्रेश रेट सपोर्टने सुसज्ज असण्याची शक्यता आहे. तर परफॉर्मंससाठी या आगामी स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 6 किंवा स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रो प्रोसेसर पाहायला मिळू शकतो.
तब्बल 20 तासांच्या आउटेजनंतर Microsoft ची क्लाउड सेवा पुन्हा सुरू; कंपनीने दिली महत्त्वाची अपडेट
अद्याप या चिपसेटचे अधिकृत नाव जाहिर करण्यात आले नाही. याव्यतिरिक्त, या नवीन उपकरणात सुमारे 10,000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असू शकते. तसेच, कंपनी यात इन-बिल्ट कूलिंग फॅनचाही समावेश करू शकते. हे फीचर्स रिपोर्ट्सवर आधारित आहेत.
Ans: iQOO 16R स्मार्टफोन भारतात डिसेंबर 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.
Ans: रिपोर्ट्सनुसार, या स्मार्टफोनची विक्री जानेवारी 2027 मध्ये सुरू होऊ शकते.
Ans: होय. iQOO च्या एका नवीन डिव्हाइसला 11 नोव्हेंबर रोजी BIS कडून मंजुरी मिळाली आहे. त्याचा मॉडेल नंबर I2606 आहे.






