Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Headlight Cleaning Tips: हेडलाइट्सवर धुकं साचतंय? फॉलो करा ‘या’ भन्नाट टिप्स

पावसाळ्यात मुसळधार पाऊस, रस्त्यावरील पाण्याचे तुषार आणि धुक्यामुळे रात्रीच्या वेळी ड्रायव्हिंग करताना समोरचा रस्ता स्पष्ट दिसण्यात अडचण येऊ शकते. अशावेळी कारचे हेडलाइट्स स्वच्छ आणि स्पष्ट असणे महत्त्वाचे आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 15, 2026 | 01:20 PM
Car Headlight Cleaning Tips: हेडलाइट्सवर धुकं साचतंय? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Car Headlight Cleaning Tips: हेडलाइट्सवर धुकं साचतंय? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात स्वच्छ हेडलाइट्समुळे रात्रीची व्हिजिबिलिटी सुधारण्यास मदत होते
  • डिशवॉश लिक्विड आणि कोमट पाण्याने हेडलाइटवरील घाण साफ करता येते
  • मायक्रोफायबर कापडाने हेडलाइट हलक्या हाताने स्वच्छ करा
पावसाळ्यात लाँग ड्राइव्हचा आनंद घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. बाहेर मुसळधार पाऊस, रस्त्यावर पाण्याचे तुषार आणि त्यात धुकं असेल तर मात्र ड्रायव्हिंग करताना काळजी घ्यावी लागते. विशेषतः रात्रीच्या वेळी समोरचा रस्ता नीट दिसत नसेल तर धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत कारचे हेडलाइट्स स्वच्छ असणे खूप महत्त्वाचे ठरते.

१. डिशवॉश आणि कोमट पाणी ठरेल उपयोगी

कारच्या हेडलाइटवर रोजची धूळ, चिखल आणि रस्त्यावरील बारीक कण जमा होत असतात. ही घाण काढण्यासाठी प्रत्येक वेळी सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याची गरज नसते. थोडं डिशवॉश लिक्विड कोमट पाण्यात मिसळा आणि त्यात मायक्रोफायबर कापड ओलं करा. त्यानंतर हेडलाइटवर हलक्या हाताने कापड फिरवा. शेवटी साध्या पाण्याने पृष्ठभाग स्वच्छ करून कोरड्या कापडाने पुसून घ्या.

२. पाण्याचे पांढरे डाग असतील तर व्हिनेगर

पावसाचं पाणी सुकल्यानंतर हेडलाइटवर पांढरट किंवा धूसर डाग दिसू शकतात. पाण्यातील खनिजांमुळे असे निशाण राहण्याची शक्यता असते. यासाठी पांढरं व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात घेऊन मिश्रण तयार करता येईल. हे द्रावण थेट हेडलाइटवर ओतण्याऐवजी मऊ कापडावर घ्या आणि लेन्स अलगद पुसा. नंतर स्वच्छ पाण्याने पृष्ठभाग धुऊन कोरडा करा. Car Headlight Cleaning Tips:

३. हलका धुरकटपणा दिसत असेल तर बेकिंग सोडा

जुन्या कारच्या हेडलाइटवर काही वेळा हलकं ऑक्सीडेशन किंवा धुरकट थर दिसतो. अशावेळी थोड्या पाण्यात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट तयार करता येते. ही पेस्ट मऊ कापडाच्या मदतीने लेन्सवर अगदी हलक्या हाताने लावा. काही वेळ पुसल्यानंतर स्वच्छ पाण्याने भाग धुवा आणि मायक्रोफायबर कपड्याने कोरडा करा.

४. तेलकट थरासाठी अल्कोहोलचा वापर

रस्त्यावरून जाताना चिखलाच्या पाण्यासोबत तेलकट पदार्थ किंवा इतर चिकट घाण हेडलाइटवर बसू शकते. साध्या पाण्याने ती सहज निघत नाही. अशा वेळी योग्य प्रकारे dilute केलेलं आयसोप्रोपाइल अल्कोहोल मऊ कापडावर घेऊन लेन्स सावकाश पुसता येते. साफ केल्यानंतर दुसऱ्या स्वच्छ आणि कोरड्या कापडाने पृष्ठभाग पूर्णपणे पुसून घ्या.


कॉफी, शॉवर, डान्स आणि शेवटी चोरी! चोराने ४.७१ लाखांची KTM बाईक लंपास करण्यापूर्वी केला भन्नाट ‘VIP ड्रामा’

५. चिखल सुकण्याआधी साफ करा

पावसाळ्यात कार चालवल्यानंतर हेडलाइटवर चिखल उडणं अगदी सामान्य आहे. मात्र हा चिखल सुकल्यानंतर तो काढताना जास्त घासावं लागू शकतं. त्यामुळे प्रवास संपल्यानंतर शक्य तितक्या लवकर हेडलाइट स्वच्छ करणं चांगलं. कोमट पाण्यात मायक्रोफायबर कापड भिजवून आधी घाण मऊ करा आणि मग हलक्या हाताने ती पुसा.

रायडर्ससाठी गुड न्यूज! Royal Enfield Himalayan 440 लवकरच बाजारात; किती असेल किंमत?

हेडलाइट स्वच्छ, तर प्रवास अधिक आरामदायी

पावसाळ्यात फक्त वायपर चांगले असणं पुरेसं नाही. कारचे हेडलाइट्सही स्वच्छ आणि व्यवस्थित असणे तितकेच गरजेचे आहे. धूळ, पाणी, चिखल किंवा धुसरपणाचा थर वाढला तर प्रकाशाची गुणवत्ता कमी होऊ शकते. त्यामुळे लाँग ड्राइव्हला निघण्यापूर्वी काही मिनिटं हेडलाइट्सकडे लक्ष दिलं तरी त्याचा फायदा होऊ शकतो.

Web Title: Easy ways to keep headlights clear in monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • automobile
  • lifestlye

संबंधित बातम्या

कॉफी, शॉवर, डान्स आणि शेवटी चोरी! चोराने ४.७१ लाखांची KTM बाईक लंपास करण्यापूर्वी केला भन्नाट ‘VIP ड्रामा’
1

कॉफी, शॉवर, डान्स आणि शेवटी चोरी! चोराने ४.७१ लाखांची KTM बाईक लंपास करण्यापूर्वी केला भन्नाट ‘VIP ड्रामा’

भारतीय बाजारात लाँच होण्यापूर्वी Jetour T2 Plug-In Hybrid SUV ला परदेशात मिळाला मोठा अपडेट! जाणून घ्या माहिती
2

भारतीय बाजारात लाँच होण्यापूर्वी Jetour T2 Plug-In Hybrid SUV ला परदेशात मिळाला मोठा अपडेट! जाणून घ्या माहिती

Volkswagen  India: १० लाखांपेक्षा कमी किमतीत येतेय फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV! पाहा काय असतील फीचर्स
3

Volkswagen  India: १० लाखांपेक्षा कमी किमतीत येतेय फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV! पाहा काय असतील फीचर्स

Royal Enfield: नवीन फीचर्ससह लाँच झाली ‘Royal Enfield Continental GT 650′; ३.५८ लाखांपासून किंमत सुरू
4

Royal Enfield: नवीन फीचर्ससह लाँच झाली ‘Royal Enfield Continental GT 650′; ३.५८ लाखांपासून किंमत सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.