
X युजर्ससाठी Elon Musk चा मोठा प्लॅन! Like बटण दाबा अन् पाठवा $1 टिप... नव्या फीचरची सर्वत्रच चर्चा
नव्या फीचरअंतर्गत यूजर्स सुरुवातीला केवळ 1 डॉलर टिप पाठवू शकणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया एक्स मनीद्वारे पूर्ण केली जाणार आहे. सध्या हे फीचर अमेरिकेतील यूजर्ससाठी सादर केले जाणार आहे. कंपनीने अद्याप या फीचरच्या इतर देशातील रोलआऊटबाबत कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे कदाचित भारतातील यूजर्सना या फीचरचा वापर करण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागू शकते. (फोटो सौजन्य – AI Created)
मस्कने अलीकडेच शेअर केलेल्या एका एक्स पोस्टमध्ये फीचरबाबत सांगतिलं आहे. मस्कचं असं म्हणणं आहे की, यूजर्सना लवकरच एक नवीन फीचर मिळणार आहे. ज्यामध्ये लाईट बटनवर दिर्घकाळ प्रेस केल्यानंतर समोरील क्रिएटरला 1 डॉलर पाठवण्याचा पर्याय मिळणार आहे.
हे फीचर कसं काम करणार याबाबत जाणून घेऊया.
Tech Tips: एका Earbud मधून कमी आवाज येतोय? घरबसल्या दूर करा समस्या, वापरा या ट्रिक्स
भारतातील एक्स यूजर्ससाठी नवीन एक्स टिपिंग फीचर कधी रोलआऊट केलं जाणार, याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे या फीचरचा वापर करण्यासाठी भारतातील यूजर्सना काही काळ वाट पाहावी लागू शकते, असा अंदाज आहे.
Ans: या फीचरमुळे X युजर्सना पोस्टवरील Like बटण दीर्घकाळ दाबून क्रिएटरला 1 डॉलरची टिप पाठवता येईल.
Ans: पोस्टवरील Like बटण लॉन्ग-प्रेस केल्यानंतर टिपिंगचा पर्याय उपलब्ध झाल्यास, X Money च्या माध्यमातून पैसे पाठवता येतील.
Ans: सुरुवातीला 1 डॉलरची टिप पाठवण्याचा पर्याय सांगण्यात आला आहे. भविष्यात रक्कम बदलता येईल का, हे अद्याप स्पष्ट नाही.