Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: एका Earbud मधून कमी आवाज येतोय? घरबसल्या दूर करा समस्या, वापरा या ट्रिक्स

Earbuds Tips: ईअरबड्सचा वापर करताना तुम्हाला देखील काही समस्या येत आहेत का? तुम्ही देखील नवीन ईअरबड्स खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर थांबा. तुम्ही घरबसल्या तुमचे ईअरबड्स दुरुस्त करू शकता. कसं? जाणून घ्या

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 26, 2026 | 09:06 AM
Tech Tips: एका Earbud मधून कमी आवाज येतोय? घरबसल्या दूर करा समस्या, वापरा या ट्रिक्स

Tech Tips: एका Earbud मधून कमी आवाज येतोय? घरबसल्या दूर करा समस्या, वापरा या ट्रिक्स

Follow Us
Follow Us:
  • सर्वात सामान्य समस्या म्हणजेच एका ईअरबड्समधून कमी आवाज येणं
  • हलक्या ब्रशने किंवा कॉटन बडने स्पीकरची जाळी हळूहळू स्वच्छ करा
  • नवीन ईअरबड्स खरेदी करण्यापूर्वी काही सोप्या टिप्स वापरा
स्मार्टफोनप्रमाणेच ईअरबड्स देखील आपल्यासाठी महत्त्वाचे गॅझेट आहे. गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी तसेच कॉलवर बोलण्यासाठी देखील ईअरबड्सचा वापर केला जातो. सध्या वायरलेस ईअरबड्सची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. कारण याचा आकार छोटा असतो, वजनाने हलके असतात आणि वापरण्यासाठी देखील अतिशय सोपे असतात. त्यामुळे ऑफीसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत अनेकजण ईअरबड्सचा वापर करतात.

9,000mAh बॅटरी अन् 100W फास्ट चार्जिंग! OnePlus Ace 7 सीरीज धमाका करण्यासाठी सज्ज… मिळणार हे खास फीचर्स

काहीवेळेस ईअरबड्सचा वापर करताना समस्या निर्माण होऊ शकतात. सर्वात सामान्य समस्या म्हणजेच एका ईअरबड्समधून कमी आवाज येणं. अशावेळी गाणी ऐकण्याचा किंवा चित्रपट पाहण्याचा अनुभव पूर्णपणे खराब होतो. अनेक यूजर्स या समस्येमुळे नवीन ईअरबड्स खरेदी करण्याचा देखील विचार करतात. पण असे करण्याची काहीच गरज नसते. कारण एका ईअरबडमधून आवाज कमी येत आहे, म्हणजे डिव्हाईस पूर्णपणे खराब झाले आहे असे नसते. सेटिंगमधील गडबड किंवा ईअरबड्समधील धूळ यामागील कारणं असू शकतात. तुम्ही घरबसल्या अगदी सहज ही समस्या सोडवू शकता.  (फोटो सौजन्य – AI Created) 

ईअरबड्सचे स्पीकर स्वच्छ करा

कोणत्याही एका ईअरबडमध्ये कमी आवाज येत असेल तर सर्वात आधी तपासून घ्या की समस्या ईअरबड्समध्ये आहे की तुमच्या फोनमध्ये. तुमच्या फोनला कनेक्ट केल्यानंतर ईअरबड्समधून कमी आवाज ऐकू येत असेल तर दुसऱ्या फोनला ईअरबड्स कनेक्ट करून गाणी ऐका. जर तुमचे ईअरबड्स दुसऱ्या फोनमध्ये व्यवस्थित काम करत असतील तर समस्या तुमच्या फोनमध्ये असू शकते.

पण जर दुसऱ्या फोनला कनेक्ट केल्यानंतर देखील ईअरबड्समधून कमी आवाज येत असेल तर सर्वात आधी स्पीकरच्या जाळीवरील धूळ स्वच्छ करा. कारण सततच्या वापरामुळे ईअरबड्सच्या स्पीकरच्या जाळीवर धूळ जमा होते आणि यामुळे आवाज कमी येतो. सुक्या मऊ कपड्याचे, हलक्या ब्रशने किंवा कॉटन बडने स्पीकरची जाळी हळूहळू स्वच्छ करा. यासाठी कोणत्याही टोकदार वस्तूचा वापर करू नका.

योग्य सिलिकॉन टिप वापरा

अनेकदा ईअरबड्सवर असलेले रबरचे सिलिकॉन टिप आपल्या कानात फीट बसत नाही. त्यामुळे ईअरबड्सचा वापर करताना देखील बाहेरील आवाज मोठ्या प्रमाणात ऐकू येतो आणि गाणी ऐकण्याचा किंवा चित्रपट पाहण्याचा अनुभव खराब होतो. अशावेळी ईअरबड्ससोबत मिळणारे इतर सिलिकॉन टिप ईअरबड्सला जोडून तुमच्या कानात फिट बसत आहे की नाही तपासा.

आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर

फोनची लेफ्ट-राइट ऑडियो बॅलेंस सेटिंग तपासा

ईअरबड्समधून व्यवस्थित आवाज न येण्याचं दुसरे कारण म्हणजेच फोनची लेफ्ट-राइट ऑडियो बॅलेंस सेटिंग बदलणे. ऑडिओ बॅलेन्स सेटिंगमध्ये स्लाइडर जर चुकून एका बाजूला गेला असेल तर आपोआप ईअरबड्समधील आवाजाची गुणवत्ता बदलू शकते. यासाठी फोनच्या सेटिंगच्या एक्सेसिबिलिटी आणि हियरिंग सेक्शनमध्ये जा. इथे तुम्हाला ऑडिओ ऍडजस्टमेंट किंवा ऑडिओ बॅलेन्सचा स्लायडर सेंटरमध्ये सेट करावा लागेल आणि मोनो ऑडिओचा टोगल देखील तपासा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एका ईअरबडमधून कमी आवाज येण्याची कारणे कोणती?

    Ans: ईअरबड्सच्या स्पीकरच्या जाळीवर धूळ किंवा कानातील मळ जमा होणे, फोनची ऑडिओ बॅलन्स सेटिंग बदलणे किंवा कनेक्शनमध्ये समस्या असणे ही संभाव्य कारणे आहेत.

  • Que: एका ईअरबडचा आवाज कमी असल्यास काय करावे?

    Ans: सर्वप्रथम ईअरबड्स दुसऱ्या फोनला कनेक्ट करून तपासा. त्यानंतर स्पीकरची जाळी स्वच्छ करा आणि फोनमधील ऑडिओ बॅलन्स सेटिंग तपासा.

  • Que: ईअरबड्सची जाळी कशी स्वच्छ करावी?

    Ans: मऊ, कोरडा ब्रश किंवा उत्पादकाने सुचवलेल्या स्वच्छतेच्या साधनाचा वापर करून जाळी हलक्या हाताने स्वच्छ करा. टोकदार वस्तू किंवा जास्त दाब वापरू नका.

Web Title: Is one earbud has low volume try these easy fixes before buying new ones hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • earbuds
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: ईयरबड्स स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? तुमची एक चूक अन् डिव्हाईस होऊ शकते खराब…
1

Tech Tips: ईयरबड्स स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? तुमची एक चूक अन् डिव्हाईस होऊ शकते खराब…

9,000mAh बॅटरी अन् 100W फास्ट चार्जिंग! OnePlus Ace 7 सीरीज धमाका करण्यासाठी सज्ज… मिळणार हे खास फीचर्स
2

9,000mAh बॅटरी अन् 100W फास्ट चार्जिंग! OnePlus Ace 7 सीरीज धमाका करण्यासाठी सज्ज… मिळणार हे खास फीचर्स

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स… Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत
3

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स… Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत

आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर
4

आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.