Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News :सैन्याने करारातील अटी मोडल्या’; स्टारलिंकवरील निर्बंधांचे समर्थन करताना इलॉन मस्क यांचा मोठा दावा

World News : युक्रेनच्या सैन्याने स्टारलिंकच्या सेवा अटींचे उल्लंघन करून आक्रमक ड्रोन हल्ल्यांसाठी इंटरनेट सेवेचा वापर केल्याचा आरोप इलॉन मस्क यांनी केला. या पार्श्वभूमीवर लावलेले निर्बंध आता हटवण्यात आले असून स्टारलिंक आणि स्टारशिल्ड सेवा पूर्ववत झाल्या आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 25, 2026 | 06:26 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • आक्रमक ड्रोन हल्ल्यासाठी वापर केल्याचा आरोप
  • निर्बंधामुळे युक्रेनच्या लष्करी कारवायांवर परिणाम
  • सेवा पूर्ववत ;मस्क यांचा अमेरिकाबाबत खुलासा
World News : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धात इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक या उपग्रह इंटरनेट सेवेवरून नवीन वाद निर्माण झाला आहे . स्पेसएक्सचे प्रमुख असलेले इलॉन मस्क यांनी युक्रेनच्या सैन्यावर आरोप केले आहेत . मस्क यांनी युक्रेनवर स्टारलिंकचे नियम व अटी मोडल्याचा आरोप केला आहे . त्यांच्या मते स्टारलिंक या नागरी इंटरनेट सेवेचा वापर आक्रमक ड्रोन हल्ल्यासाठी करण्यात आला आहे . यामुळे त्यांनी युक्रेनच्या स्टारलिंक वापरावर बंदी घातली आहे .

मस्क यांच्या विधानाने युक्रेनच्या लष्करी हालचाली आणि अमेरिकेशी असलेल्या संबंधावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे . या युद्धात स्टेरलिंकचा वापर करून युक्रेनने रशियाला मोठे नुकसान पोहोचवले आहे . तसेच इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात एकाच वेळी जवळपास १६० लहान मुलं मुली मारल्या गेल्या तेव्हा मस्क यांची माणुसकी कुठे होती . ज्या माणुसकीने ते आज युक्रेनवर वर आरोप करून आपली नैतिकता दाखवत आहेत . असे ही प्रश्न मस्क यांना विचारले जात आहेत .

आक्रमक ड्रोन हल्ल्यासाठी वापर केल्याचा आरोप

रशिया युक्रेन युद्धात अचानक युक्रेनमधील स्टारलिंक ही इंटरनेट सेवा बंद झाल्याने जागतिक पातळीवर चर्चा सुरु झाल्या . सुरवातीला विश्लेषक तर्क वितर्क काढत असतानाच इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच एक्स वर पोस्ट करत खुलासा केला कि , युक्रेनच्या सैन्याने स्टेरलिंकच्या सेवा अटींचे उल्लंघन केले .स्टारलिंक ही व्यावसायिक आणि नागरी इंटरनेट सेवा असून , लोकांना ठार मारण्यासाठी याचा वापर करणे चुकीचे आहे .

खासकरून ड्रोन हल्ल्यात याचा वापर झाला असल्याचे त्यांनी सांगितले . आमच्या या सेवेचा वापर करून माणसांना मारण्याची परवानगी युक्रेनला कधीही दिली न्हवती असे त्यांनी म्हंटले . या वापरासाठी असलेली तांत्रिक पळवाट बंद करण्यात आल्याचेही मस्क यांनी सांगितले आहे .

Bangladesh : चौकात फाशी की शिरच्छेद? मक्का येथे 2 बांगलादेशींच्या फाशीवर ढाकाचा सौदीला ‘या’ 6 प्रश्नांचा झटका

निर्बंधामुळे युक्रेनच्या लष्करी कारवायांवर परिणाम

गेल्या आठवड्यात स्टारलिंकने सेवा बंद केल्यानंतर युक्रेनच्या सैन्याला अडचणींचा सामना करावा लागला . खासकरून वेगाने प्रवास करणाऱ्या ड्रोन आणि लष्करी उपकरणांच्या संपर्क व्यवस्थेवर परिणाम झाला . सैनिकांमधील संवाद , लष्करी रसद आणि रशियन ड्रोन हल्ल्यानां उत्तर देण्याच्या क्षमतेवरही त्याचा परिणाम झाल्याचे समोर आले आहे .

Bangladesh : ‘गेल्या अनेक वर्षांतील सर्वोत्तम दुर्गापूजा’ तारिक रहमान सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे बांगलादेशात नांदणार शांतता

सेवा पूर्ववत ;मस्क यांचा अमेरिकाबाबत खुलासा

याच दरम्यान युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी २४ ऑक्टोबर रोजी स्टारलिंक आणि स्टारशील्ड सेवा पूर्वीच्या वेगाने सुरु झाल्याचे जाहीर केले . युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनीही सेवा स्थिर झाल्याची माहिती दिली . मस्क यांनी स्टारशील्ड ही वेगळी लष्करी प्रणाली असून तिचे नियंत्रण अमेरिकन सरकारकडे असल्याचे स्पष्ट केले .

स्टारलिंक सेवा पूर्णपणे बंद झाल्यास युक्रेनची बाजू कमकुवत होऊन ढासळू शकते . असा इशाराही त्यांनी दिला आहे . या सगळ्या प्रकरणामुळे आधुनिक युद्धात खाजगी कंपन्यांच्या उपग्रह इंटरनेट सेवेचे महत्व आणि त्यावरील नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे .

Web Title: World news army breaks contract terms elon musks big claim in support of restrictions on starlinkcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • America news
  • elon musk
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

Itchy Ears After Bathing: कानात सतत खाज येण्यामागे असू शकतात ही कारणं; डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा
1

Itchy Ears After Bathing: कानात सतत खाज येण्यामागे असू शकतात ही कारणं; डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

Bangladesh : ‘गेल्या अनेक वर्षांतील सर्वोत्तम दुर्गापूजा’ तारिक रहमान सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे बांगलादेशात नांदणार शांतता
2

Bangladesh : ‘गेल्या अनेक वर्षांतील सर्वोत्तम दुर्गापूजा’ तारिक रहमान सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे बांगलादेशात नांदणार शांतता

Nagpur News :स्वातंत्र्यापूर्वीच्या कागदपत्रांना सर्वोच्च महत्त्व; उच्च न्यायालयाचा निकाल ;आदिवासीदाव्याचा मार्ग सुकर
3

Nagpur News :स्वातंत्र्यापूर्वीच्या कागदपत्रांना सर्वोच्च महत्त्व; उच्च न्यायालयाचा निकाल ;आदिवासीदाव्याचा मार्ग सुकर

Japan Earthquake : तिबेटनंतर जपानमध्ये 6.5 तीव्रतेचा जोरदार भूकंप! बोनिन बेटांमध्ये हादरली जमीन; पण त्सुनामीचा धोका टळला
4

Japan Earthquake : तिबेटनंतर जपानमध्ये 6.5 तीव्रतेचा जोरदार भूकंप! बोनिन बेटांमध्ये हादरली जमीन; पण त्सुनामीचा धोका टळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.