Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एलन मस्कचं X युजर्सना दिवाळी गिफ्ट! सबस्क्रिप्शन प्लॅन 40% स्वस्त, आता दरमहा मोजावे लागणार इतके पैसे

सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म X ने आपल्या युजर्सना दिवळीच्या निमित्ताने एक मोठी भेट दिली आहे. X ने आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किंमतीवर 40 टक्के डिस्काऊंट देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय X युजर्ससाठी फायदेशीर आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 26, 2024 | 10:19 AM
एलन मस्कचं X युजर्सना दिवाळी गिफ्ट! सबस्क्रिप्शन प्लॅन 40% स्वस्त, आता दरमहा मोजावे लागणार इतके पैसे

एलन मस्कचं X युजर्सना दिवाळी गिफ्ट! सबस्क्रिप्शन प्लॅन 40% स्वस्त, आता दरमहा मोजावे लागणार इतके पैसे

Follow Us
Follow Us:

सोशल मिडीया प्लॅटफॉर्म X चा मालक एलन मस्क सर्व X युजर्ससाठी दिवाळीचं स्पेशल गिफ्ट घेऊन आला आहे. दिवळीच्या काळात मस्कने सर्व X युजर्सना एक प्रीमियम प्लॅन संबंधित एक मोठं गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट म्हणजे आता X युजर्सना सबस्क्रिप्शन प्लॅनवर 40 टक्के डिस्काऊंट दिलं जाणार आहे. म्हणजेच आतापर्यंत 566 रुपये प्रति महिना उपलब्ध असणारा X चा सबस्क्रिप्शन प्लॅन आता केवळ 340 रुपये प्रति महिना या किंमतीत उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रमियम प्लॅनची खरेदी करण्यासाठी X युजर्ससाठी ही एक अत्यंत चांगली संधी आहे.

हेदेखील वाचा- YouTube Shopping Affiliate Program भारतात लाँच, कार्यक्रमाला जागतिक बाजारपेठेत जबरदस्त यश

X युजर्सना आता केवळ 340 रुपये प्रति महिना या किंमतीत ब्लू टिक आणि एक्सची प्रीमियम मेंबरशिप विकत घेण्याची संधी मिळणार आहे. प्रति महिना सबस्क्रिप्शन प्लॅनप्रमाणेच तुम्हाला संपूर्ण वर्षाच्या सबस्क्रिप्शन प्लॅनवर देखील डिस्काऊंट दिलं जाणार आहे. X चा संपूर्ण वर्षाचा सबस्क्रिप्शन प्लॅन 6800 रुपयांमध्ये उपलब्ध होता. मात्र आता ही किंमत केवळ 4080 रुपये झाली आहे. म्हणजेच X युजर्सना संपूर्ण वर्षासाठी केवळ 4080 रुपयांत प्रीमियम मेंबरशिप मिळणार आहे. एलन मस्कने यंदाच्या दिवाळीत X च्या प्रीमियम आणि प्रीमियम प्लस प्लॅनच्या किंमतीत बदल केला आहे. प्रीमियम प्लॅनवर युजर्सना 40 टक्के डिस्काऊंट दिलं जाणार आहे. तर प्रमियम प्लस प्लॅन देखील युजर्सना कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

प्रिमियम प्लॅन्सवर मिळणार हे फायदे

  • हाफ अ‍ॅड्स इन फॉर यू अ‍ँड फॉलोइंग
  • लार्जर रिप्लाय बूस्ट
  • गेट पेड टू पोस्ट
  • चेकमार्क
  • Grok 2 AI असिस्टेंस
  • एक्स प्रो, एनालिस्टिक, मीडिया स्टूडियो
  • क्रिएटर सब्सक्रिप्शन
हेदेखील वाचा- एवढं व्हायरल नव्हतं व्हायचं, मी JioHotstar डोमेनचा कायदेशीर मालक आहे; व्हायरल पोस्टवर डेव्हलपरची प्रतिक्रिया

प्रिमियम प्लस सबस्क्रिप्शनवर मिळणार 40 टक्के डिस्काऊंट

युजर्सना प्रीमियम प्लस प्लॅनवरही 40 टक्क्यांची प्रचंड सूट मिळत आहे. यानंतर प्रिमियम प्लस प्लॅन मिळवण्यासाठी यूजर्सला दर महिन्याला फक्त 680 रुपये द्यावे लागतील. तर त्याची मूळ किंमत 1,133 रुपये आहे. तसेच, संपूर्ण वर्षाच्या प्रिमियम प्लस सबस्क्रिप्शनची, किंमत 13,600 रुपयांवरून 8,160 रुपये करण्यात आली आहे. या प्लॅन अंतर्गत यूजर्सना अनेक फायदे मिळतात. यामध्ये जाहिराती मुक्त आणि सर्वात मोठे रिप्लाय बूस्ट वैशिष्ट्य देखील समाविष्ट आहे. याशिवाय यूजर्सना यात अनेक मस्त फीचर्स देखील मिळतात. एलन मस्कने हा प्रीमियम प्लॅन गेल्या वर्षी लाँच केला होता.

प्रीमियम प्लस प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

  • फुली एड फ्री
  • लार्जेस्ट रिप्लाय बूस्ट
  • राइट आर्टिकल्स
  • रडार
एलन मस्कने X ला आणखी खास बनवण्यासाठी रडार लाँच केलं आहे. रडार प्रीमियम प्लस वापरकर्त्यांना ट्रेंडिंग विषय, ताज्या बातम्या आणि लाइव्ह इव्हेंट्सवर दुसऱ्या सेंकदाला अपडेट्स देणार आहे. रडार युजर्सना अधिक वेगाने प्रत्येक क्षणाचे अपडेट्स उपलब्ध करून देण्यासाठी लाँच करण्यात आलं आहे.

Web Title: Elon musk diwali gift for x users now you can get 40 percent discount on x subscription know the exact amount

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 10:19 AM

Topics:  

  • elon musk

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.