आता चॅटिंग होणार आणखी मजेदार! Elon Musk ने लाँच केला XChat, फोन नंबरशिवाय कॉलिंग आणि जबरदस्त सिक्योरिटी फीचर्सने सुसज्ज
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचा मालक असलेल्या मस्कने एक नवीन धमाका केला आहे. एलन मस्कने X प्लेटफॉर्मवर एक नवीन मेसेजिंग फीचर XChat लाँच केलं आहे. मस्कने उचलेलं हे पाऊल टेक्नोलॉजी क्षेत्रातील एक मोठी प्रगती मानली जात आहे. कारण मस्कने यापूर्वीच सांगितलं आहे की, त्याला सोशल मीडिया एक्सला एव्हरिथिंग अॅप बनवायचं आह. याबाबत मस्कने आधीच घोषणा केली होती. या दिशेने मस्कने प्रयत्न देखील सुरु केले आहेत.
मस्कने यापूर्वीच एक्समनीची घोषणा केली आहे. त्यानंतर आता मस्कने XChat लाँच केलं आहे. त्यामुळे आता एक्स एव्हरिथिंग अॅपच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे गेलं आहे. या नवीन चॅटिंग फीचरमध्ये युजर्सना अधिक प्रायव्हसी, मजबूत सिक्योरिटी आणि अगदी सोपा इंटरफेस दिला जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
XChat, X प्लेटफॉर्मचे नवीन इनबिल्ट चॅट फीचर आहे. हे फीचर सध्या केवळ पेड सब्सक्राइबर्ससाठी उपलब्ध आहे. यामध्ये यूजर्सना एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह वॅनिशिंग मेसेजेस म्हणजेच काही वेळाने ऑटोमॅटिकली गायब होणारे मेसेज पाठवण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे. या फीचरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या मदतीने ऑडियो आणि व्हिडीओ कॉल करण्यासाठी कोणाच्याही फोन नंबरची गरज नाही. म्हणजेच आता चॅटिंग आणि कॉलिंग दोन्हींसाठी फक्त एक X अकाउंटची गरज आहे, फोन नंबरची नाही.
एलन मस्कने दावा केला आहे की, XChat ला एका नवीन एन्क्रिप्शन आर्किटेक्चरवर तयार करण्यात आलं आहे, जो Rust वर आधारित आहे. याला ‘बिटकॉइन स्टाइल एन्क्रिप्शन’ असं म्हटलं जात आहे. ज्यामुळे हे स्पष्ट होतं की, युजर्सच्या सिक्योरिटीबाबत इथे कोणताही निष्काळजीपण केला जाणार नाही. याशिवाय युजर्सना त्यांचे चॅट आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी चार अंकी पासवर्ड सेट करण्याचा देखील पर्याय दिला जाणार आहे.
XChat अद्याप बीटा वर्जनमध्ये आहे, मात्र रिपोर्टनुसार यामध्ये ग्रुप चॅटचे फीचर जोडले जाणार आहे. यासोबतच युजर्स त्यांना नको असलेले चॅट्स अनरीड ठेऊ शकता. एक्सचॅटमुळे कोणत्याही प्रकारची फाइल पाठवता येणार असल्याने आता फाइल शेअरिंग देखील सोपे होणार आहे. सध्या XChat सुरुवातीच्या वर्जनमध्ये उपलब्ध असून पेड यूजर्ससाठी रिलीज करण्यात आलं आहे. मात्र अशी अपेक्षा आहे की, XChat लवकरच सर्व युजर्ससाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
X ला एक everything app बनवावं, असं मस्कचं स्वप्न आहे. यासाठी मस्क सतत नवीन फीचर्स आणि अपडेट रिलीज करत आहे. सोशल मीडिया पासून पेमेंट, कॉलिंग, चॅटिंग सर्वकाही एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावं, यासाठी मस्क प्रयत्न करत आहे. एक्स हळूहळू एक मल्टीफंक्शनल प्लॅटफॉर्म बनत आहे.