भारतानंतर आता यूरोपनेही घेतला मोठा निर्णय, लवकरच बॅन होणार Chinese Apps! डेटा चोरीसह हे आहेत गंभीर आरोप
चीनी अॅप्सबाबत सतत नवीन अपडेट समोर येत असतात. कधी या अॅप्सवर डेटा चोरीचा आरोप केला जातो, तर कधी युजर्सची माहिती दुसऱ्या कंपनीला दिल्याचा आरोप केला जातो. याच सततच्या आरोपांमुळे अनेक देशांंमध्ये चिनी अॅप्स बॅन केले जात आहेत. 2020 मध्ये भारताने अनेक चिनी अॅप्सवर बंदी आणली होती. त्यानंतर अनेक देशांनी या चिनी अॅप्सवर कठोर कारवाई केली. आता पुन्हा एकदा हे चिनी अॅप्स चर्चेत आले आहेत, कारण आता यूरोपने या अॅप्सवर बंदी घालण्याचा विचार केला जात आहे.’
डेटा चोरी आणि देशातील नियमांचे उल्लंघण केल्यामुळे यूरोपने आता चिनी अॅप्सवर कठोर कारवाई करण्याचा विचार केला जात आहे. TikTok, WeChat आणि AliExpress सारख्या अॅप्सवर पुन्हा एकदा डेटा चोरीसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या एडवोकेसी प्रायव्हसी ग्रुप NOYB ने या चिनी अॅप्सबाबत युरोपियन युनियन (EU) कडे तक्रार दाखल केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ऑस्ट्रेलियाच्या एडवोकेसी प्रायव्हसी ग्रुप NOYB ने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की हे चिनी अॅप्स यूजर्सच्या प्रायव्हसीबाबत तयार करण्यात आलेल्या धोरणाचे पालन करत नाही, त्यामुळे या चिनी अॅप्सवर कठोर कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. काही अहवालात असे देखील म्हटले आहे की EU कठोर कारवाई करून या अॅप्सवर बंदी घालू शकते. EU धोरणानुसार, यूजर्सना त्यांचा डेटा डाउनलोड करण्याची सुविधा दिली पाहिजे. त्यामुळे आता या अॅप्सबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
NYOB ने त्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, तिन्ही अॅप्स TikTok, WeChat आणि AliExpress मध्ये यूजर्सना त्यांचा डेटा डाऊनलोड करण्याचा ऑप्शन दिला जात नाही. त्यामुळे हे प्रायव्हसीचे उल्लंघण असल्याचं सांगितलं जात आहे. यासोबतच, या ग्रुपचा असाही दावा आहे की यूजर्सना चिनी अॅप्समध्ये वैयक्तिक डेटा अॅक्सेस करण्याचा पर्याय मिळत नाही.
अॅडव्होकेसी ग्रुप NYOB बऱ्याच काळापासून डेटा प्रायव्हसीवर काम करत आहे. या ग्रुपने आतापर्यंत सहा चिनी कंपन्यांविरुद्ध तक्रार केली आहे. त्यांचा आरोप आहे की हे अॅप्स बेकायदेशीरपणे यूजर्सचा डेटा चीनमधील त्यांच्या सर्व्हरवर पाठवत आहेत. याआधी या ग्रुपच्या तक्रारीवरून अॅपल आणि अल्फाबेटसारख्या अमेरिकन कंपन्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता या तक्रारीनंतर चिनी अॅप्सवर देखील कठोर कारवाई करत हे अॅप्स बॅन करण्याचा विचार केला जात आहे.
चिनी अॅप्सवरील डेटा चोरीबाबत यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी आल्या आहेत. यासोबतच, चिनी अॅप्सवर यूजर्सचा डेटा चुकीच्या पद्धतीने साठवून तो चीनला पाठवल्याचा आरोपही आहे. जर चिनी अॅप्सवरील आरोप खरे ठरले आणि युरोपियन युनियनने त्यांच्यावर कारवाई केली तर युरोपमध्ये या अॅप्सवर बंदी घालण्यात येऊ शकते.