वनप्लस युजर्ससाठी आनंदाची बातमी! लाँच झालं OxygenOS 15 अपडेट, आता स्मार्टफोन वापरण्याची मज्जा होणार दुप्पट
वनप्लस युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने OxygenOS 15 अपडेट अखेर लाँच केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या नवीन अपडेटची चर्चा होती. हे अपडेट नक्की कधी लाँच होणार याबाबत वनप्लस युजर्सनाा प्रचंड उत्सुकता लागली होती. मात्र आता अखेर हे अपडेट लाँच करण्यात आलं आहे. या नवीन अपडेटमुळे वनप्लस युजर्सचा स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. नवीन अपडेटसह स्मार्टफोन वापरताना युजर्सना थ्रीलिंग अनुभव मिळणार आहे.
हेदेखील वाचा- गूगल मॅपचे हे AI फीचर्स तुमच्यासाठी ठरणार वरदान, चुटकीसरशी सोडवतील तुमच्या समस्या
वनप्लसने OxygenOS 15 चे अनावरण केले आहे. कंपनीने हे अपडेट AI आणि अनेक अपग्रेड केलेल्या फीचर्ससह आणले आहे. यामध्ये यूजर्सची सुरक्षा आणि प्राइवेसी देखील पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. सर्च आणि नोट टेकिंग सुधारण्यासाठी प्रगत AI वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. याशिवाय, थेफ्ट प्रोटेक्शन फीचर देखील अपडेटमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
OnePlus ने त्याचे नवीनतम OxygenOS 15 अपडेट सादर केले आहे. Android 15 आधारित OS अनेक नवीन फीचर्ससह
लाँच करण्यात आले आहे. कंपनीने ब्लॉटवेअर फ्री अनुभव आणि उत्तम परफॉर्मेंससह नवीन अपडेट आणले आहे. यामध्ये AI कॅपिबिलिटीजसह कस्टमाइजेबल यूआई एलिमेंट आणि अनेक मल्टीटास्किंग ऑप्शन उपलब्ध आहेत. हे अपडेट वनप्लस वापरकर्त्यांचा अनुभव कसा सुधारणार आहे आणि त्यात कोणते नवीन फीचर्स दिले आहेत, चला पाहूया
OxygenOS 15 मध्ये अनेक नवीन ॲनिमेशन देण्यात आले आहेत, जे वापरकर्त्याचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक मजेदार बनवतील. नवीन ॲनिमेशन सीमलेस ट्रांजिशन आणि एप्लिकेशनमध्ये सहजतेने कार्य करतात. नवीन OS जास्त वापरात असतानाही चांगल्या कामगिरीचे आश्वासन देते.
फोटोग्राफी, शोध आणि नोट टेकिंग सुधारण्यासाठी नवीन OS मध्ये एडवांस AI फीचर समाविष्ट करण्यात आली आहेत. AI डिटेल बूस्ट लो-रिझोल्युशन चित्रांना जबरदस्त 4K व्हिज्युअलमध्ये रूपांतरित करते, तर AI अनब्लर आणि AI रिफ्लेक्शन इरेझर अस्पष्ट आणि रिफ्लेक्शनमुळे खराब झालेल्या ईमेज क्षणाधार्त सुधारतो. OxygenOS 15 देखील Google Gemini सह एकत्रित केले आहे.
हेदेखील वाचा- एवढं व्हायरल नव्हतं व्हायचं, मी JioHotstar डोमेनचा कायदेशीर मालक आहे; व्हायरल पोस्टवर डेव्हलपरची प्रतिक्रिया
यात नवीन ॲनिमेशनसह रीफ्रेश व्हिज्युअल स्टाइल, आयकॉन आणि कस्टमायझेशन पर्याय आहेत. यामुळे फोनचा लूक पूर्णपणे नवीन होईल. हे यूजर्सची प्राइवेसी देखील पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करते. यामध्ये एक कॉम्प्रिहेंसिव थेफ्ट प्रोटेक्शन मेकॅनिज्म देखील देण्यात आलं आहे, जे डिव्हाइस चोरीला गेल्यास तुमचा डेटा सुरक्षित ठेवेल. डिव्हाइसला काहीतरी चोरी झाल्याचे आढळल्यास, ते ऑटोमॅटिकली लॉक होईल. यात रिमोट लॉक फीचर देखील आहे जे केवळ मोबाईल नंबरसह फोन लॉक करण्याची परवानगी देते.
OnePlus 12 5G साठी OxygenOS 15 चे बीटा वर्जन 30 ऑक्टोबर रोजी सर्वांसाठी उपलब्ध केलं जाणार आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस, कंपनी अधिक स्मार्टफोन्ससाठी AI फीचर्ससह अपडेट जारी करू शकते. गूगल जेमिनी ॲप अपकमिंग OnePlus फ्लॅगशिप डिव्हाइसेसवर डीफॉल्ट AI असिस्टेंट म्हणून एकत्रित केले जाईल.
OxygenOS चे प्रोडक्ट डायरेक्टर आर्थर लॅम यांनी सांगितले की आम्ही अपडेटमध्ये अनेक नवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे. स्मार्टफोन सॉफ्टवेअरमध्ये जे काही दिले जाऊ शकते ते या अपडेटमध्ये आहे. आम्ही वापरकर्त्यांसाठी शक्तिशाली आणि नाविन्यपूर्ण OS आणण्यास उत्सुक आहोत.