गूगल मॅपचे हे AI फीचर्स तुमच्यासाठी ठरणार वरदान, चुटकीसरशी सोडवतील तुमच्या समस्या
आतापर्यंत आपल्या प्रत्येक प्रवासासाठी गूगल आपल्यासाठी वरदान ठरत होतं. गूगल मॅप हे आजच्या काळात एक अत्यावश्यक ॲप बनले आहे, जे दैनंदिन जीवनात अनेक वेळा वापरले जाते. गूगल मॅपशिवाय आपण कोणत्याही अनोळखी ठिकाणी जाण्याचा विचार देखील करू शकत नाही. गूगल मॅपचे देसभरात प्रचंड युजर्स आहेत. या युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ देखील होत आहे. वाढत्या युजर्सप्रमाणेच गूगल मॅप देखील दिवसेंदिवस अपग्रेड होत आहे. गूगल मॅपमध्ये अनेक नवीन फीचर्स लाँच केले जात आहेत, जे युजर्सचा प्रवास अधिस सोपा आणि मजेशीर करू शकतात.
हेदेखील वाचा- गुगल मॅपच्या वॉकिंग मोड फीचरबद्दल माहीत आहे का? आता क्षणार्धात समजणार रस्ता
गूगल मॅप आता पूर्वीसारखा राहिला नसून तो खूप अपग्रेड झाला आहे. गुगल मॅपवर अशा अनेक AI फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे, जे तुम्हाला एक जबरदस्त अनुभव देणार आहे. आम्ही तुम्हाला अशाच पाच AI फीचर्सबद्दल सांगणार आहोत जे तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहेत. हे फीचर्स तुम्हाला प्रत्येक प्रवासात मदत करणार आहेत. यामुळे तुमच्या प्रवासाचा अनुभव अधिकच मजेदार होणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
कन्वर्जेशनल मॅप सर्च: गूगल मॅपमधील या AI वैशिष्ट्याच्या मदतीने, तुम्ही थेट गूगल मॅपसोबत चॅट करू शकता आणि कोणतीही माहिती मिळवू शकता. युजर्सच्या बेस्ट रिजल्टसाठी, AI बिजनेस डिटेल्स, फोटोज, रेटिग्ंस आणि रिव्यूसह गूगल मॅपवरील अनेक माहितीचा वापर केला जाईल.
लाइव व्यू ऑन मॅप्स: दुसरे फीचर लाइव व्यू ऑन मॅप्स आहे. यामध्ये, काहीतरी शोधण्यासाठी, तुम्हाला लाइव्ह व्ह्यू वापरून कॅमेरा आयकॉनवर टॅप करावे लागेल. या फीचरच्या मदतीने तुम्ही एटीएम, रेस्टॉरंट्स, पार्क्स, ट्रान्झिट स्टेशन्स किंवा तुमच्या जवळील इतर कोणतीही माहिती उघडण्याची आणि बंद करण्याची माहिती सहज मिळवू शकता. Arrow च्या मदतीने तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनबद्दल जाणून घेऊ शकता.
हेदेखील वाचा- आता चुकीच्या रस्त्यापासून मिळणार सुटका! प्रवास करताना गुगल मॅपवर करा ही सेटिंग
न्यू इमरसिव व्यू: न्यू इमरसिव व्यू या AI फीचरच्या मदतीने, तुम्ही कुठेही जाण्यापूर्वीच त्या ठिकाणाबद्दल बरेच डिटेल्स मिळवू शकता. जसे की, तुम्ही हवामानाचा अंदाज, गर्दीची वेळ, फोटोरिअलिस्टिक व्यूज आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ शकता. याशिवाय, यावेळी ठिकाण आतून कसे दिसते हे पाहण्यासाठी तुम्ही रेस्टॉरंटचे इनडोअर दृश्य देखील पाहू शकता.
न्यू मल्टी सर्च: आता आपण नवीन मार्गाने आपल्याला पाहिजे ते शोधण्यासाठी शब्द आणि प्रतिमा एकत्र करू शकता. यामध्ये तुम्हाला लाखो स्थानिक व्यवसायांची माहिती देखील मिळू शकते.
AI सजेशन्स मिळवा: याशिवाय, पाचवे उत्तम फीचर म्हणजे तुम्ही गूगल मॅपवर AI-पावर्ड सजेशन्स पाहण्यास सक्षम असाल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला पाऊस जाणून घ्यायचा असेल, तर या फीचरच्या मदतीने तुम्ही नकाशेवर पावसाच्या एक्टिविटीबद्दल जाणून घेऊ शकता आणि कोणत्याही कॉमेडी शो किंवा चित्रपटगृहाबद्दल सूचना देखील मिळवू शकता.