
Free Fire MAX: गेमर्ससाठी धमाका! ‘King of Gold’ इमोट फ्री मिळवण्याची संधी, फक्त करावं लागणार 'हे' काम
फ्री फायर मॅक्समध्ये सुरु झालेला फेडेड व्हिल ईव्हेंट पुढील 11 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक गेमिंग आयटम्स क्लेम करण्याची संधी मिळार आहे. या ईव्हेंटमध्ये किंग ऑफ गोल्ड ईमोट देखील समाविष्ट आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या गेममध्ये मिळणारे रिवॉर्ड्स प्लेअर्सच्या नशिबावर अवलंबून असणार आहेत. या ईव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे आणि त्यानंतर रिवॉर्ड्स मिळणार आहेत. रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)
फ्री फायर मॅक्समध्ये प्रत्येक स्पिनची किंमत वेगळी आहे. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. दुसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी 19 डायमंड्स खर्च करावे लागतील. तिसऱ्या स्पिनची किंमत 39 डायमंड्स आणि चौथ्या स्पिनची किंमत 69 डायमंड्स आहे. पाचव्या स्पिनची किंमत 99 डायमंड्स आणि सहाव्या स्पिनची किंमत 149 डायमंड्स आहे. सातवेळा स्पिन करण्यासाठी 199 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर आठवेळा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 499 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे.