Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईलवर येणार आपत्ती अलर्ट! मेसेज पाहून घाबरू नका… सरकार करतंय नव्या सिस्टिमची चाचणी

भारतात कोणत्याही क्षणी भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ किंवा पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊ शकतात. अशावेळी लोकांपर्यंत वेळीच योग्य माहिती पोहोचवणं अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी आता सरकार एक चाचणी करत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 01, 2026 | 01:13 PM
मोबाईलवर येणार आपत्ती अलर्ट! मेसेज पाहून घाबरू नका... सरकार करतंय नव्या सिस्टिमची चाचणी

मोबाईलवर येणार आपत्ती अलर्ट! मेसेज पाहून घाबरू नका... सरकार करतंय नव्या सिस्टिमची चाचणी

Follow Us
Follow Us:
  • दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या सहकार्याने मोबाईल आपत्ती अलर्ट सिस्टिमची चाचणी सुरु आहे.
  • ही सिस्टिम सामान्य सूचना प्रोटोकॉल आणि सेल ब्रॉडकास्ट टेक्नोलॉजीवर आधारित आहे.
  • सरकारने स्पष्ट केलं आहे की, टेस्टिंगदरम्यान येणारे मेसेज केवळ चाचणीसाठी आहेत आणि नागरिकांनी घाबरू नये.
भारत सरकार देशभरात एक नवीन मोबाईल आधारित आपत्ती अलर्ट सिस्टिमची चाचणी करत आहे. या चाचणीदरम्यान नागरिकांच्या फोनवर मेसेज पाठवले जाऊ शकतात. याबाबत सरकारने सूचना जारी केली आहे. सरकारने सांगितलं आहे की, हे मेसेज पाहून घाबरून जाण्याची गरज नाही. कारण हे मेसेज सुरु असलेल्या चाचणीचा एक भाग आहेत. याचा उद्देश लोकांना घाबरवणं नाही तर लोकांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्याचा आहे.

Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका

दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे सुरु आहे चाचणी

दूरसंचार विभागाद्वारे ही चाचणी केली जात आहे. या चाचणीमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने देखील सहभाग घेतला आहे. दोघेही एकत्र येऊन देशात मोबाईलद्वारे आपत्ती संबंधित माहिती देण्याची प्रणाली आणखी मबजूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सरकारचे असे उद्दिष्ट आहे की, कोणत्याही आपत्तीजन्य किंवा अपात्कालीन परिस्थितीत लोकांना वेळीच सूचना दिली जावी, ज्यामुळे नुकसान होऊ नये आणि लोकांची सुरक्षा वाढावी. (फोटो सौजन्य – Pinterest)

कसे काम करणार ही सिस्टिम

ही अलर्ट सिस्टिम ‘कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल’ (CAP) वर आधारित असणार आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने सुचवले आहे ही सिस्टिम सर्व 36 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आधीपासूनच सक्रीय आहे. या सिस्टिमच्या मदतीने एखाद्या विशेष भागातील मोबाईल यूजर्सना एसएमएसद्वारे आपत्तीसंंबंधित सूचना पाठवल्या जातात. याचा फायदा असा आहे की, ज्या ठिकाणी धोका असेल अशा भागातील लोकांना अलर्ट पाठवला जातो.

सेल ब्रॉडकास्ट टेक्नोलॉजी

एसएमएसव्यतिरिक्त आता सेल ब्रॉडकास्ट टेक्नोलॉजीचा देखील वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाद्वारे एखाद्या विशेष भागातील सर्व मोबाईल डिव्हाईसवर एकाचवेळी मेसेज पाठवला जातो. यामुळे सर्व लोकांना रियल-टाइममध्ये अलर्ट मिळतो. ही सिस्टिम मोठ्या भागात एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत अलर्ट पोहोचवण्यासाठी प्रभावी मानली जाते. अशी माहिती मिळाली आहे की, ही संपूर्ण सिस्टिम टेलिमॅटिक्स विकास केंद्राने डिझाईन आणि डेव्हलप केली आहे. ही सिस्टिम ‘मेक इन इंडिया’ चे अतिशय उत्तम उदाहरण मानले जात आहे, ज्यामध्ये देशातील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही सिस्टिम लाँच करण्यापूर्वी सरकारने त्याची विश्वसनीयता आणि परफॉर्मंसची चाचणी केली आहे.

Tech Tips: नवा RO प्यूरीफायर खरेदी करण्याचा विचार करताय? या गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, नाहीतर कराल पश्चाताप

लोकांसाठी जारी केल्या सूचना

चाचणीदरम्यान तुमच्या फोनवर इंग्रजी, हिंदी किंवा संबंधित भागातील भाषेत एसएमएस पाठवले जाऊ शकतात. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की, या मेसेजकडे दुर्लक्ष करा आणि घाबरू नका. ही केवळ एक चाचणी सुरु आहे.

Web Title: India tests mobile based disaster alert system citizens advised not to panic tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • Emergency Alert
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
1

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
2

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
3

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
4

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.