
Tech Tips: स्मार्टफोनमधील Flight Mode फीचर आहे बऱ्याच कामाचं! अद्भुत फायदे वाचून तुम्ही व्हाल चकित
प्रत्येक स्मार्टफोनमध्ये Flight Mode किंवा Airplane Mode फीचर दिलेलं असतं. अनेक युजर्स नेटवर्कची समस्या सोडवण्यासाठी या फीचरचा वापर करतात. म्हणजेच जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये नेटवर्कची समस्या येत असेल तर काही क्षणासाठी फोनमधील Flight Mode किंवा Airplane Mode फीचर ऑन करून मग ऑफ करायचं, ज्यामुळे नेटवर्कची समस्या सुटते, असं अनेक स्मार्टफोन युजर्स मानतात. पण तुम्हाला माहीत आहे का की हे फीचर केवळ स्मार्टफोनमधील नेटवर्क समस्या सोडवण्यासाठीच नाही तर इतर अनेक कामांसाठी फायद्याचे ठरते? या फीचरचे अनेक अद्भुत फायदे आहेत ज्याबद्दल 90 टक्के युजर्सना माहिती नाही.
स्मार्टफोनमध्ये असणारं Flight Mode किंवा Airplane Mode हे सर्वात कॉमन फीचर आहे. हे फीचर फोनमधील वायरलेस नेटवर्क ब्लॉक करते, ज्यामुळे विमानाच्या नेव्हिगेशन सिस्टममध्ये कोणताही व्यत्यय येत नाही आणि पायलट सहजपणे नेव्हिगेट करू शकतात. खरं तर हे फीचर विमानातून प्रवास करताना सर्रास वापरलं जातं. पण हे फीचर इतर अनेक कामांसाठी फायद्याचे आहे. आता आम्ही तुम्हाला या फीचरचे इतर फायदे सांगणार आहोत जे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
Flight Mode किंवा Airplane Mode फीचरचा वापर करून स्मार्टफोनची चार्जिंग स्पीड वाढवली जाऊ शकते. जेव्हा तुम्हाला तुमचा स्मार्टफोन चार्जिंगला लावायचा असेल तेव्हा तुम्ही Flight Mode किंवा Airplane Mode फीचर ऑन करू शकता. यामुळे डिव्हाइसवर येणारे सर्व प्रकारचे नेटवर्क थांबतील आणि चार्जिंग 25 टक्क्यांनी फास्ट होईल. यामुळे तुमचा स्मार्टफोन लवकर चार्ज होईल.
इंटरनेट आणि नेटवर्कमुळे अनेकदा आपला स्मार्टफोन सतत गरम होतो. पण Flight Mode किंवा Airplane Mode फीचरच्या मदतीने तुम्ही ही समस्या सोडवू शकता. हे फीचर ऑन केल्यानंतर नेटवर्क ब्लॉक होते आणि डिव्हाईसमधील ॲक्टिव्हिटी कमी होते, ज्यामुळे स्मार्टफोन जास्त गरम होत नाही आणि हिटिंग समस्या सोडवण्यासाठी मदत होते.
जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन लहान मुलांना गेम खेळण्यासाठी किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी देणार असला, तर सर्वात आधी फोनमधील Flight Mode किंवा Airplane Mode फीचर ऑन करा. यामुळे मुलं इंटरनेटचा वापर करू शकणार नाही आणि कोणतेही ॲप देखील डाउनलोड करू शकणार नाही. यामुळे डिव्हाईस मुलांसाठी सुरक्षित बनते आणि लहान मुलं असुरक्षित कंटेंटपासून दूर राहतात.
जर तुम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं असेल किंवा कोणतंही महत्वाचं काम करायचं असेल, तर अशावेळी स्मार्टफोनमधील Flight Mode किंवा Airplane Mode फीचर ऑन करा. हे ॲप फोन कॉल, मेसेज आणि नोटिफिकेशन्स सायलेंट करेल, जेणेकरून तुम्ही तुमचे काम पूर्ण लक्ष केंद्रित करून करू शकाल. या फीचरमुळे लक्ष विचलित होण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.