आता तुमचे Apple डिव्हाईस होणार अधिक सुरक्षित, कंपनी घेऊन येतेय AppleCare One सब्सक्रिप्शन! 'या' युजर्सना होणार फायदा
टेक जायंट कंपनी Apple च्या प्रोडक्ट्सची जगभरात क्रेझ आहे. आयफोन, मॅकबुक, अॅपल वॉच, आयपॅड हे सर्व डिव्हाईस खरेदी करण्यासाठी लोक प्रचंड उत्सुक असतात. पण या डिव्हाईसची किंमत प्रचंड असते, त्यामुळे या डिव्हाईसच्या युजर्सना सर्वात जास्त चिंता या डिव्हाईसच्या सुरक्षेची असते. तुम्ही देखील Apple डिव्हाईस युजर आहात का आणि तुम्हाला तुमच्या डिव्हाईसची सुरक्षेची चिंता सतत सतावत असते का? आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण Apple एक नवीन प्लॅन घेऊन आला आहे.
Apple ने त्यांच्या करोडो युजर्ससाठी एक खास AppleCare One नावाचा सब्सक्रिप्शन प्लॅन लाँच केला आहे. या सब्सक्रिप्शन प्लॅनच्या मदतीने तुम्ही तुमचे Apple डिव्हाईस सुरक्षित ठेऊ शकता. या सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत प्रति महिना $19.99 म्हणजेच सुमारे 1,700 रुपये आहे. या सब्सक्रिप्शन प्लॅनमध्ये तुम्ही तुमचे तीन Apple प्रोडक्ट्स सुरक्षित ठेऊ शकता. याशिवाय तुम्ही $5.99 म्हणजेच सुमारे 500 रुपये प्रति महिना खर्च करून AppleCare One सब्सक्रिप्शन प्लॅनअंतर्गत तुमचे आणखी काही डिव्हाईस सुरक्षित ठेऊ शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple is introducing AppleCare One, a new way for customers to cover multiple Apple products under one plan 🚨
You can protect up to 3 devices for $19.99/month, and add more for $5.99/month each, including devices you already own (up to 4 years old, if in good condition).… pic.twitter.com/xyKgsfckvy
— Apple Hub (@theapplehub) July 23, 2025
खरं तर नवीन AppleCare One अशा लोकांसाठी डिझाईन करण्यात आला आहे, ज्यांच्याकडे iPhone, iPad किंवा Apple Watch सारखे अनेक Apple प्रोडक्ट्स आहेत आणि हे युजर्स त्यांच्या प्रोडक्ट्सची सर्विस आणि सपोर्ट मॅनेज करण्यासाठी एक सोप्या आणि फायदेशीर प्लॅनच्या शोधात असतील त्यांच्यासाठी AppleCare One फायद्याचे ठरणार आहे. हा नवीन AppleCare One सब्सक्रिप्शन प्लॅन 24 जुलैपासून अमेरिकेतील युजर्ससाठी Apple ची वेबसाइट, रिटेल स्टोर किंवा iPhone, iPad किंवा Mac द्वारे उपलब्ध आहे.
या नवीन सबस्क्रिप्शन प्लॅनच्या आगमनानंतर, तुम्हाला आता वेगवेगळ्या डिव्हाईससाठी AppleCare+ खरेदी करावे लागणार नाही. AppleCare One एकाच मंथली पेमेंटमध्ये तुमच्या सर्व डिव्हाइसेसना कव्हर करते. या कव्हरमध्ये एक्सीडेंटल डॅमेज ड्राप, स्पिल प्रोटेक्शन, तसेच बॅटरी आणि Apple कस्टमर सर्विसमध्ये प्रायोरिटी एक्सेस मिळतो.
Tech Tips: 2 की 3… किती कॅमेराऱ्यावाला iPhone आहे बेस्ट? 90 टक्के लोकं करतात ही मोठी चूक
आधी हा प्लॅन केवळ iPhones साठी उपलब्ध होता. मात्र आता हा प्लॅन iPads आणि Apple Watches साठी देखील उपलब्ध करण्यात आला आहे. हा सब्सक्रिप्शन प्लॅन अशा लोकांसाठी फायद्याचा ठरणार आहे, जे दररोज आयपॅड किंवा वॉच घालून बाहेर पडतात किंवा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतात. या नवीन प्लॅनमुळे Apple च्या इकोसिस्टमशी जोडलेल्या यूजर्सना AppleCare+ प्रत्येक प्रोडक्टसाठी स्वतंत्रपणे खरेदी करावे लागणार नाही. Apple चं असं म्हणणं आहे की, तीन वेगवेगळ्या AppleCare+ प्लॅनऐवजी AppleCare One प्लॅन घेतल्याने युजर्सना $11 म्हणजेच सुमारे 950 रुपयांचा फायदा होणार आहे.