Flipkart – Amazon Sale 2025: हिवाळा आला रे! थंडीवर मात करण्यासाठी खरेदी करा टॉप 5 बजेट गीझर्स, सेलमध्ये जबरदस्त ऑफर्स उपलब्ध
फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज आणि अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये क्रॉम्पटन, बजाज आणि हॅवेल्स सारख्या ब्रँड्सचे गीझर कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. यामध्ये एनर्जी-एफ्फिसिएंट ऑप्शंसपासून हाय कॅपेसिटीवाल्या वॉटर हीटरपर्यंत अनेकांचा समावेश आहे. थंडीचे वातावरण सुरु झाले आहे. थंडीमध्ये सर्वात महत्त्वाचं गॅझेट असतं, गीझर. आता आम्ही तुम्हाला काही ऑफर्सबद्दल सांगणार आहोत, जे सेलमध्ये कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही देखील नवीन गीझर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या ऑफर्स तुमच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात.
iPhone 17 मॉडेल्स की समस्यांचा भंडार! युजर्सना येताय एकामागून एक समस्या, कंपनीने काय सांगितलं?
अॅमेझॉनवर सुरु असलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये क्रॉम्पटनचा 15 लीटरचा 5 Star रेटेड स्टोरेज वॉटर हीटर आता कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. सेलदरम्यान तुम्ही हा गीझर केवळ 5,499 रुपयांत खरेदी करू शकणार आहात. SBI Debit कार्डसह या गीझरवर 1500 रुपयांपर्यंत एक्स्ट्रा डिस्काउंट देखील मिळणार आहे. त्यामुळे या गीझरची किंमत आणखी कमी होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्लिपकार्टवर हावेल्सचा हा 15 लीटरचा 4 Star रेटेड स्टोरेज वॉटर हीटर देखील डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलदरम्यान तुम्ही हा गिझर केवळ 7,240 रुपयांना खरेदी करू शकणार आहात. एचडीएफसी बँक कार्डलेस ईएमआय सोबत, या गीझरवर 1500 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील दिली जात आहे, त्यानंतर गीझरची किंमत आणखी कमी होते. त्यामुळे ही ऑफर तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.
बजाजचा हा गीजर सेलमध्ये देखील कमी किंमतीत उपलब्ध आहे, याची कॅपेसिटी 25 लीटर आहे. अमेझॉन सेल दरम्यान तुम्ही हा गीझर फक्त 7,090 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या गीझरवर SBI डेबिट कार्डसह 1500 रुपयांपर्यंतची सूट देखील मिळते. त्यामुळे गीझरवरील डिस्काऊंट आणखी वाढते आणि गीझरची किंमत कमी होते.
फ्लिपकार्टवर हॅवेल्सचा हा 25 लीटरवाला 4 Star रेटेड स्टोरेज वॉटर हीटर देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलदरम्यान तुम्ही हा गिझर केवळ 4,999 रुपयांना खरेदी करू शकणार आहात. एचडीएफसी बँक कार्डलेस ईएमआय सोबत, या गीझरवर 1500 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील दिली जात आहे, त्यानंतर गीझरची किंमत खूपच कमी होते. बजेट किंमतीत गिझर शोधणाऱ्यांसाठी ही डिल फायद्याची ठरणार आहे.
फ्लिपकार्ट सेलमध्ये Voltas चा हा 25 लीटर स्टोरेज वॉटर हीटर देखील कमी किंमतीत उपलब्ध आहे. सेल दरम्यान, तुम्ही हा गीझर फक्त 5,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या गीझरवर HDFC बँक कार्डलेस EMI पर्यायासह 1500 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट देखील मिळते. बँक ऑफरसह, या गीझरची किंमत आणखी कमी आहे.