iPhone 17 मॉडेल्स की समस्यांचा भंडार! युजर्सना येताय एकामागून एक समस्या, कंपनीने काय सांगितलं?
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लाँच करण्यात आलेल्या आयफोन 17 सिरीजमधील मॉडेल्सची विक्री आता सुरु झाली आहे. कंपनीने अनेक देशांमध्ये या मॉडेल्सची विक्री सुरु केली आहे. ज्या दिवशी आयफोन 17 सिरीजमधील मॉडेल्सची विक्री सुरु झाली तेव्हापासून ग्राहकांनी हे नवीन मॉडेल्स खरेदी करण्यासाठी अॅपल स्टोअर बाहेर गर्दी केली होती. खरं तर कंपनीने लाँच केलेला हा नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी सर्वजण प्रचंड उत्सुक होते. मात्र आता या आयफोन मॉडेल्सबाबत तक्रारी सुरु झाल्या आहेत.
सिरीज खरेदी केल्यानंतर काही दिवसांतच युजर्सची डोकेदुखी वाढली आहे. कारण युजर्सना या नवीन सिरीजमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रो मॉडेल्समध्ये स्क्रॅचेजसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. तर अमेरिकेतील काही युजर्सनी सिरीजमधील मॉडेल्सच्या समस्यांसोबतच नेटवर्क कनेक्टिविटीची देखील समस्या येत असल्याचं सांगितलं. यानंतर आता आणखी एक अहवाल समोर आला आहे, यामध्ये सांगितल आहे की, आयफोन 17 आणि आयफोन एयर मॉडलमध्ये कनेक्टिविटीच्या समस्या येत आहेत. ज्यामुळे -फाय, ब्लूटूथ आणि वायरलेस कारप्लेवर देखील परिणाम होत आहे. रेडिट आणि ऐप्पल सपोर्ट फोरममध्ये अनेक युजर्सनी सांगितलं की, जेव्हा ते फोन अनलॉक करतात किंवा लॉक स्क्रीन पाहतात तेव्हा डिव्हाइस वाय-फायवरून डिस्कनेक्ट होतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
वायफायद्वारे चालणार कारप्लेमध्ये देखील युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक चालकांनी तक्रार केली आहे की, हे थांबून -थांबून चालते आणि अनेकदा कनेक्शन देखील तुटतं. त्याचप्रमाणे, एअरपॉड्स आणि थर्ड-पार्टी अॅक्सेसरीज वापरताना कनेक्शन वारंवार तुटत आहे. यूजर त्यांचा आयफोन जेव्हा अनलॉक करतात, तेव्हा वाय-फाय कनेक्टिव्हिटी तात्पुरती तुटते. काही क्षणांनी तो पुन्हा कनेक्ट होतो, परंतु यामुळे युजर्सना काळजी वाटत आहे.
आयफोन 17 मॉडल्समध्ये कंपनीची नवीन N1 वायरलेस चिप देण्यात आली होती. या चिपबाबत सुरुवातीला अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. तथापि, iOS 26.1 बीटा अपडेटची चाचणी घेणाऱ्या काही यूजर्सनी अपडेटनंतर कनेक्टिव्हिटी समस्या सोडवल्याचे नोंदवले. असं सांगितलं जात आहे की, या सॉफ्टवेयरसंबंधित समस्या आहेत. कंपनी देखील नवीन iOS 26.0.1 अपडेटवर काम करत आहे, ज्यामध्ये युजर्सच्या अनेक समस्या सोडवल्या जाण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला तुमच्या नवीन आयफोनमध्ये अशा कोणत्याही कनेक्टिव्हिटी समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही अपडेटची वाट पाहू शकता.