iPhone 16 Pro Max ची किंमत झाली कमी (फोटो सौजन्य - Apple)
जर तुम्ही प्रीमियम फोन खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर आता तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अॅपलचा नवीन आणि सगळ्यात पॉवरफुल समजला जाणारा फोन आयफोन १६ प्रो मॅक्स आता पूर्वीपेक्षा खिशाला अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाला आहे. त्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे.
यासोबतच, अनेक उत्तम डीलदेखील उपलब्ध आहेत. तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात? जर तुम्हाला हा फोन स्वस्तात खरेदी करायचा असेल, तर स्टॉक संपण्यापूर्वी तो लवकर ऑर्डर करा. पण ही ऑफर नक्की कुठे आहे आणि याची किंमत काय आहे याबाबत महत्त्वाची माहिती तुम्हीही जाणून घ्या (फोटो सौजन्य – Apple)
धमाकेदार ऑफर
स्टायलिश डिझाइन, उत्तम फीचर्स आणि उत्कृष्ट कॅमेरा क्वालिटीसाठी ओळखला जाणारा iPhone 16 Pro Max आता चांगल्या सवलतीत उपलब्ध आहे. तुम्ही तो फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता, जिथे त्यावर एक उत्तम ऑफर उपलब्ध आहे. बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्यामुळे आय़फोनची किंमत आणखी कमी होताना दिसून येत आहे आणि या संधीचा तुम्ही त्वरीत लाभही घेऊ शकता.
किती आहे किंमत
किती आहे कमी झालेली किंमत
ब्लॅक टायटॅनियम रंगात येणाऱ्या आयफोन १६ प्रो मॅक्सच्या २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १,४४,९०० रुपये आहे. पण, ८% च्या सवलतीनंतर तो १,३२,९०० रुपयांना उपलब्ध आहे. अशा प्रकारे, तुम्हाला १२,००० रुपयांची थेट बचत मिळते. तसेच, त्यावर एक्सचेंज ऑफरदेखील उपलब्ध आहे. तथापि, एक्सचेंज व्हॅल्यू फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असते.
एक्स्चेंज ऑफर आणि बँक डिस्काऊंट
जर तुम्ही चांगल्या स्थितीत असलेला आयफोन १५ प्रो एक्सचेंज केला तर तुम्हाला ५३,२०० रुपयांची सूट मिळू शकते आणि तुम्ही हा फोन ७९,७०० रुपयांना खरेदी करू शकता. तसेच, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला ५% कॅशबॅक मिळेल. याशिवाय, क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला ३००० रुपयांची सूट देखील मिळेल, जेणेकरून तुम्ही फोन अधिक स्वस्तात खरेदी करू शकाल.
Mark Zuckerberg ने लाँच केले AI स्मार्ट ग्लासेस! 8 तासापर्यंत मिळणार फुल चार्ज, जाणून घ्या किंमत
iPhone 16 Pro Max चे वैशिष्ट्य
फक्त किंमतीत कपात झाली आहे म्हणून नाही, तर iPhone 16 Pro Max हा स्वतःच एक पॉवरहाऊस आहे. हा फोन उत्तम वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे.