Realme चा सर्वात पातळ स्मार्टफोन केवळ 17,499 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे जबरदस्त Deal
तुम्ही देखील एक नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? एक असा स्मार्टफोन ज्यामध्ये मोठी बॅटरी आणि अनेक खास फीचर्स उपलब्ध असतील. तर तुम्ही Realme च्या या 5G स्मार्टफोनचा विचार करू शकता. सध्या Realme च्या या 5G स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट जबरदस्त डिल ऑफर करत आहे. त्यामुळे तुम्हाला हा 5G स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा स्मार्टफोन म्हणजेच Realme P4 5G.
Realme P4 5G मध्ये 7000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कंपनीने या डिव्हाईसमध्ये 50MP चा रियर कॅमेरा दिला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये अनेक जबरदस्त AI फीचर्स देण्यात आले आहेत. अनेक फीचर्सने सुसज्ज असलेल्या या स्मार्टफोनवर आता फ्लिपकार्टवर डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे जर तुम्ही 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
खरं तर Realme P4 5G हा स्मार्टफोन कंपनीने 20,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता या स्मार्टफोनवर फ्लॅट 2500 रुपयांचे डिस्काऊंट दिले जात आहे. या डिस्काऊंटनंतर स्मार्टफोनची किंमत केवळ 18,499 रुपये झाली आहे. एवढंच नाही तर या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. निवडक बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे, त्यानंतर फोनची किंमत फक्त 17,499 रुपये होईल.
Flipkart SBI Credit कार्ड आणि Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डसह फोनच्या खरेदीवर आणखी 4000 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे ही डिल आणखी आकर्षक होते. याशिवाय, या फोनवर एक खास एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे जिथे तुम्ही तुमच्या जुन्या फोनची किंमत 17,200 रुपयांपर्यंत मिळवू शकता, त्यासोबत कंपनी 2000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस देखील देत आहे. याचा अर्थ एक्सचेंज ऑफरमुळे हे डिवाइस आणखी आश्चर्यकारक बनते.
डिव्हाईसच्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.77 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यासोबत फोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. फोनचा कॅमेरा सेटअप देखील खूप चांगला आहे जिथे मागे 50MP + 8MP ड्युअल रियर कॅमेरा आहे तर समोर 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये 7000 mAh बॅटरी आणि Mediatek Dimensity 7400 प्रोसेसर आहे जो तो खूप शक्तिशाली बनवतो.