Apple vs Google: iPhone 17 आणि Pixel 10 मध्ये कोण आहे बेस्ट? कोणता फ्लॅगशिप फोन युजर्सना देतो सर्वात चांगला अनुभव?
iPhone 17 आणि Google Pixel 10 हे दोन्ही स्मार्टफोन अलीकडेच लाँच करण्यात आले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन एकाच प्राईज रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहेत. मात्र या दोन्हीपैकी कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे? आता आम्ही या दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोनच्या फीचर्सची तुलना करणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजू शकेल की यापैकी कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.
iPhone 17 ला Ceramic Shield 2 च्या मदतीने आणखी मजबूत करण्यात आले आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हे तीन पट जास्त स्क्रॅच-रेजिस्टेंट आहे. याचे वजन केवळ 177 ग्रॅम आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन एक हलका आणि कॉम्पॅक्ट पर्याय बनतो. तर Google Pixel 10 चे वजन 204 ग्रॅम आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे आणि नवीन Pixelsnap मॅग्नेटिक Qi2 स्टँडर्ड देण्यात आले आहे. जे मॅगसेफ अॅक्सेसरीजसह देखील काम करते. दोन्ही फोन IP68 प्रमाणित आहेत आणि धूळ आणि पाणी प्रतिरोधक आहेत.
iPhone 17 च्या बेस मॉडेलमध्ये पहिल्यांदा 120Hz ProMotion डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे 6.3-इंच OLED पॅनल 1Hz ते 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट एडजस्ट करू शकतो आणि यामध्ये 3000 निट्स ब्राइटनेस देण्यात आली आहे. तसेच Pixel 10 मध्ये देखील 6.3-इंच OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz पर्यंत जातो. दोन्हीमधील फरक केवळ इतका आहे की, आयफोनचा Always-On डिस्प्ले अधिक स्मूथ आणि पॉवर-कार्यक्षम अनुभव देतो. (फोटो सौजन्य – X)
iPhone 17 मध्ये A19 चिप आहे, जी 3nm प्रोसेसवर तयार करण्यात आली आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. तर Pixel 10 मध्ये गुगलची पहिली पूर्णपणे इन-हाऊस Tensor G5 चिप आहे जी 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येते. एप्पल चिप बेंचमार्क्समध्ये आघाडीवर असली तरी देखील Pixel 10 AI फीचर्स जसे Magic Cue आणि Camera Coach साठी नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.
iPhone 17 मध्ये डुअल 48MP कॅमेरा सिस्टम (मुख्य + अल्ट्रावाइड) आणि नवीन 18MP फ्रंट कॅमेरा आहे. जे रुंद फ्रेम्स कॅप्चर करण्यास मदत करते. मात्र यामध्ये अजूनही टेलीफोटो लेंस नाही. Pixel 10 मध्ये तीन कॅमेरे आहेत, ज्यामध्ये 10.8MP टेलिफोटो लेन्स 5x ऑप्टिकल झूम आणि 30x AI झूमला सपोर्ट करतो. झूम फोटोग्राफी आवडणाऱ्या यूजर्ससाठी हा एक मोठा फायदा आहे.
Apple ने बॅटरी क्षमतेचा खुलासा केलेला नाही परंतु iPhone 17 मध्ये 30 तासांपर्यंत ऑफलाइन व्हिडिओ प्ले करता येतात असा दावा त्यांनी केला आहे. Pixel 10 मध्ये 4,970mAh बॅटरी देण्यात आली आहे. iPhone 17 हा 40W वायर्ड आणि 25W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. Pixel 10 मध्ये 30W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
iPhone 17 ची सुरुवातीची किंमत 256GB मॉडेलसाठी 82,900 रुपये आणि 512GB मॉडेलसाठी 1,02,900 रुपये ठेवण्यात आली आहे. Google Pixel 10 ची अधिकृत किंमत 79,999 रुपये (12GB + 256GB मॉडेल) आहे परंतु हा फोन अमेझॉनवर 74,999 रुपयांना उपलब्ध आहे.