
Free Fire MAX: अखेर ठरलंच! गेममधील OB51 अपडेट या दिवशी होणार रिलीज, नव्या कॅरेक्टरला मिळणार हे खास शक्ती
गरेनाने अखेर फ्री फायर मॅक्स OB51 अपडेटची रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर केली आहे. हे नवीन अपडेट 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता रोलआउट केलं जाणार आहे. हे अपडेट प्लेअर्स गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्स OB51 मध्ये मिळणार नवीन कॅरेक्टर Nero: नवीन अपडेटसह गेममध्ये नवीन ब्रँड-न्यू कॅरेक्टरची देखील एंट्री होणार आहे. या कॅरेक्टरचं नाव Nero असं आहे. हे कॅरेक्टर Cryomind Skill सह प्लेअर्ससाठी उपलब्ध केलं जाणार आहे. हे कॅरेक्टर ड्रीमी स्पेस क्रिएट करून ग्लू वॉलला डिसेबल करण्यासाठी आणि त्याच्यावर मात करण्यासाठी सक्षम आहे.
नवीन अपडेट फ्लेम अरेना थीमसह रिलीज केलं जाणार आहे. यामध्ये प्लेअर्सना फ्लेम एज बंडल मिळणार आहे.
गेममध्ये 4 नवीन लोडआउट्स जुन्या सिस्टमसह रिप्लेस केले जाणार आहेत. यामध्ये टीम बूस्टर, एन्हांस हॅमर, टॅक्टिकल मार्केट आणि सुपर लेग पॉकेट इत्यादींचा समावेश आहे. थोडक्यात नवीन OB51 अपडेट गेममध्ये अनेक नवीन गोष्टी घेऊन येणार आहे. जर तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल तर काही दिवसांत फ्री फायर मॅक्सचे नवीन व्हर्जन तुमच्या हातात येणार आहे.