Instagram Restyle Tool: फोटो आणि व्हिडीओ एडीट करणं झालं सोपं! इंस्टाग्राम घेऊन आलं नवं फीचर, फक्त टाईप करा हा प्रॉम्प्ट
Meta च्या मालकीचे असलेल्या इंस्टाग्रामने त्यांच्या युजर्ससाठी एक खास फीचर लाँच केलं आहे. सोशल मीडिया क्रिएटिविटी एका वेगळ्या स्तरावर नेण्यासाठी इंस्टग्रामने नवीन फीचर लाँच केलं आहे. हे एक AI-Powered Restyle Tool आहे, जे युजर्सच्या स्टोरी सेक्शनमध्ये एडिटिंगची जादू घेऊन येणार आहे. याचा अर्थ असा आहे की, युजर्सना एडीटींगसाठी कोणत्याही तिसऱ्या अॅपची गरज नसेल. युजर्सना केवळ काही शब्द टाईप करावे लागणार आहे आणि इंस्टाग्राम स्वत: तुमचे फोटो आणि व्हिडीओ एडीट करणार आहे.
हे फीचर विशेष करून क्रिएटर्स, कंटेंट मेकर्स आणि सामान्य युजर्ससाठी लाँच करण्यात आलं आहे, जे युजर्सच्या स्टोरिजना यूनिक टच देणार आहेत. हे Restyle फीचर का गरजेचं आहे आणि या फीचरमुळे हे इंस्टाग्राम इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळं कसं असणार, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Insta)
इंस्टाग्रामचे हे नवीन रिस्टाईल फीचर आता स्टोरीज एडिटिंग इंटरफेसमध्ये पाहायला मिळणार आहे. जेव्हा तुम्ही कोणतेही फोटो आणि व्हिडीओ अपलोड कराल, तेव्हा वरच्या उजव्या कोपऱ्यात एक नवीन रिस्टाईल बटन पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही फोटो एडीट करत असाल तर तुम्हाला एक AI टेक्स्ट प्रॉम्प्ट बॉक्स मिळणार आहे. जिथे तुम्ही लिहू शकता की, “Add crown on the girl’s head” किंवा “Change lighting to sunset glow.” तर व्हिडीओसाठी, इंस्टाग्रामने प्रीसेट AI ईफेक्ट्स दिले आहेत. जसे, सिनेमॅटिक लूक, फिल्म नॉयर स्टाईल किंवा futuristic ‘outer space’ vibes. एवढं केल्यानंतर Meta AI तुमच्या फोटो आणि व्हिडीओला एक नवीन रुप देणार आहे.
या फीचरचे सर्वात मोठे विशेषण असं आहे की, युजर्सना एडिटिंगसाठी कोणत्याही थर्ड पार्टी टूल किंवा अॅपची गरज नाही. AI आता स्वत: तुमच्या कंटेटचा मूड, कलर, आणि फोकस एडजस्ट करू शकणार आहेत. याशिवाय नको असलेला बॅकग्राऊंड देखील हटवू शकणार आहेत, लाईटिंग बदलू शकणार आहेत, याशिवाय पूर्ण सीन एस्थेटिकमध्ये बदलू शकणार आहेत. याचा अर्थ असा की काही सेकंदातच तुमची कहाणी ‘कॅज्युअल फोटो’ मधून ‘मूडी व्हिज्युअल आर्ट’ मध्ये बदलू शकते. Restyle फीचर पूर्णपणे मोफत असणार आहे. या फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सना कोणत्याही सब्सक्रिप्शन किंवा पेड फिल्टरची गरज नसेल.
Instagram नुसार, Restyle फीचरचा पूर्ण फायदा तेव्हाच मिळणार आहे जेव्हा AI प्रॉम्प्ट्स डिटेलमध्ये लिहीणं गरजेचं आहे. जसे,
Add warm sunset lighting with cinematic tone” किंवा “Make it look like a vintage Paris street shot.” तुमचा प्रॉम्प्ट जितका जास्त स्पेसिफिक असेल तेवढाच आउटपुट परफेक्ट असणार आहे.






