Friendship Day 2025: तुमच्या मित्रांना द्या खास सरप्राईज, यंदा चॉकलेट नाही तर हे Gadgets करा गिफ्ट
मित्र – मैत्रिणींच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे. 3 ऑगस्ट 2025 रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. फ्रेंडशिप डे निमित्त आपण आपल्या मित्र – मैत्रिणींसाठी नेहमीच एका खास गिफ्टच्या शोधात असतो. कधी फोटोफ्रेम तर कधी चॉकलेट, कधी ड्रेस तर कधी मेकअप किट, हे गिफ्ट आपल्या मनात नेहमीच येतात. पण नेहमीच हे गिफ्ट का द्यावेत, असा प्रश्न आपल्या मनात येतो. यंदा फ्रेंडशिप डे ला फोटोफ्रेम, चॉकलेट किंवा मेकअप किट नाही तर एखादं खास गॅझेट गिफ्ट द्या. जसं की तुम्ही किंडल पेपरव्हाइट किंवा क्यूबो कार डॅशकॅम प्रो चा देखील विचार करू शकता. हे गिफ्ट्स अतिशय अर्थपूर्ण आहे.
तुमच्या एखाद्या मित्राला गाडी चालवायला आवडत असेल तर त्याच्यासाठी क्यूबो कार डॅशकॅम प्रो २.७ के हे एक बेस्ट गिफ्ट आहे. रात्री उशिरा गाडी चालवणे असो किंवा एकट्याने रोड ट्रिप करणे असो, हा ड्युअल-कॅमेरा डॅशकॅम रात्रीच्या वेळीही समोर आणि मागे दोन्ही ठिकाणं स्पष्टपणे रेकॉर्ड करतो. जीपीएस, वाय-फाय आणि आपत्कालीन जी-सेन्सर असे या गॅझेटचे फिचर्स आहेत. त्यामुळे ज्या मित्राला गाडी चालवायला आवडते त्यांच्यासाठी हे गॅझेट बेस्ट ठरणार आहे.
ज्यांना वाचण्याची आवड आहे अशा मित्रांना यंदा पुस्तक न देता किंडल पेपरव्हाइट गिफ्ट करू शकता. ज्यांना अजूनही वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट गिफ्ट आहे. नवीनतम किंडल पेपरव्हाइट जलद आणि आकर्षक आहे. या डिव्हाईसमध्ये ७-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. आठवडाभर टिकणारी बॅटरी आणि लक्ष विचलित न करता वाचण्याचा अनुभव यामुळे हे गॅझेट अतिशय लोकप्रिय आहे. हे पुस्तकप्रेमींसाठी परिपूर्ण गिफ्ट आहे.
तुमच्या एखाद्या मित्राला रेट्रो गेमिंग आवडत असेल तर त्यांना GSH R36S हँडहेल्ड गेम कन्सोल गिफ्ट करू शकता. हे ३.५-इंचाचे हँडहेल्ड एमुलेटर जुन्या काळातील मारियो, कॉन्ट्रा आणि आर्केड क्लासिक्ससारखे जुन्या आठवणींनी भरलेले आहे. १२८ जीबी स्टोरेज आणि रंगीत डिझाइनसह हे गॅझेट प्रवासासाठी किंवा बैठकांमध्ये झोनिंग करण्यासाठी परिपूर्ण आहे. तुमच्या ग्रुपमध्ये एखादा गेम बॉय असेल तर त्याच्यासाठी हे एक बेस्ट गिफ्ट आहे.
ज्यांना अलेक्सा गॅझेटची आवड असेल तर त्यांच्यासाठी अमेझॉन इको पॉप हे एक सर्वोत्तम गिफ्ट आहे. बेडरूम, डेस्क किंवा अगदी स्वयंपाकघरांसाठी उत्तम गॅझेट आहे. स्मार्ट स्पीकर, अलार्म घड्याळ, दैनिक बातम्यांचे अपडेटर, पार्टी डीजे या सर्वांसाठी हे गॅझेट अतिशय परिपूर्ण आहे.
Bitchat Mesh: App Store वर उपलब्ध झाला नवा चॅटिंग अॅप, आता मेसेज करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही!
ज्या मित्राला फोटोग्राफीची आवड आहे त्याला फोटोफ्रेम नाही फुजीफिल्म इन्स्टॅक्स मिनी ४१ गिफ्ट करा. झटपट प्रिंट्स, विंटेज व्हाइब्स आणि चांगला बिल्ट-इन फ्लॅश या वैशिष्ट्यांसह हे गॅझेट परिपूर्ण आहे. ज्यांना अजूनही स्क्रॅपबुक, जर्नलिंग किंवा फ्रिज-फोटो वॉल आवडतात त्यांच्यासाठी फुजीफिल्म इन्स्टॅक्स मिनी ४१ बेस्ट आहे.
फ्रेंडशिप डे कधी साजरा केला जाणार आहे?
3 ऑगस्ट, 2025
बजेट किंमतीत गॅझेट खरेदी करू शकता का?
हो