Bitchat Mesh: App Store वर उपलब्ध झाला नवा चॅटिंग अॅप, आता मेसेज करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही!
ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी iPhone युजर्ससाठी Bluetooth-बेस्ड एक नवं मेसेजिंग प्लॅटफॉर्म लाँच केले आहे. Bitchat Mesh असं या नवीन मेसेजिंग अॅपचं नाव आहे. या अॅपची लाँचिंग Twitter च्या को-फाउंडरने सादर केलेल्या पीयर-टू-पीयर (P2P) अॅपनंतर करण्यात आलं आहे. Bluetooth-बेस्ड नवं मेसेजिंग प्लॅटफॉर्म Bitchat Mesh चा वापर करण्यासाठी इंटरनेट, फोन नंबर किंवा ईमेल एड्रेसची देखील गरज नाही. हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (E2EE) आणि आइडेंटिटी व्हेरिफिकेशनला देखील सपोर्ट करते.
जॅक डोर्सी यांनी लाँच केलेलं हे नवीन मेसेजिंग प्लॅटफॉर्म App Store वर उपलब्ध आहे. हे प्लॅटफॉर्म Play Store वर कधी उपलब्ध करून दिलं जाणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. (फोटो सौजन्य – App Store)
bitchat?
now on the App Store: https://t.co/uzB0uqRJGy
— jack (@jack) July 28, 2025
iPhone यूजर्स आता Bitchat Mesh हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म App Store वरून डाऊनलोड करू शकतात. याबाबत डोर्सी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. या अॅपच्या डिस्क्रिप्शनमध्ये असं लिहीलं आहे की, हे अॅप इंटरनेट अॅक्सेसशिवाय चॅटिंग करण्याची परवानगी देते आणि Bluetooth mesh नेटवर्कवर काम करते. Bitchat Mesh यूजर्समध्ये डायरेक्ट कनेक्शनला सपोर्ट करते, परंतु ते नेटवर्कवरील दूसरे पीयर्सना देखील मेसेज फॉरवर्ड करते, ज्यामुळे यूजर्स ब्लूटूथ रेंजच्या बाहेर असतानाही संवाद साधू शकतात.
नवीन Bitchat Mesh अॅप एक अतिशय साध्या आणि सोप्या इंटरफेस येते. यामध्ये, यूजर एखाद्याला ‘फेवरेट’ म्हणून मार्क करू शकतात, मेंशन करू शकतात आणि नको असलेले कॉन्टॅक्ट देखील ब्लॉक करू शकतात. Bitchat साठी जारी करण्यात आलेल्या whitepaper मध्ये सांगण्यात आलं आहे की, मेसेज Noise प्रोटोकॉल फ्रेमवर्कचा वापर करून E2EE ने प्रोटेक्ट केले जातात. हे फीचर युजर्सना व्हेरिफाय करण्याची देखील सुविधा देतात, ज्यामुळे युजर्सना समजतं की ते ज्या व्यक्तिसोबत चॅट करत आहेत, तो योग्य व्यक्ति आहे की नाही. यासाठी, यूजर त्यांचे ‘फिंगरप्रिंट्स’ समोरासमोर किंवा दुसऱ्या ऑनलाइन चॅनेलद्वारे जुळवू शकतात आणि नंतर त्यांना ‘व्हेरिफाईड’ म्हणून मार्क करू शकतात.
iPhone यूजर्स App Store वरून Bitchat Mesh डाउनलोड करू शकतात. Bitchat Mesh च्या App Store लिस्टिंगमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की, हे अॅप कोणताही डेटा गोळा करत नाही. याशिवाय हे अॅप कोणत्याही अकाऊंट आणि सर्वरशिवाय काम करते. हे अॅप iOS 16 किंवा त्यानंतरच्या आवृत्तीवर काम करते, तर Android 8.0+ वर चालणाऱ्या स्मार्टफोनसाठी सपोर्ट लवकरच उपलब्ध होईल. Bitchat च्या वेबसाइटवरील सिक्योरिटी नोटिस यूजर्सना इशारा देते की लोकल मेसेजेसप्रमाणे प्राइवेट (१:१) चॅट्सचा अद्याप एक्सटर्नल सिक्योरिटी रिव्यू घेतलेला नाही आणि त्यांचा वापर संवेदनशील माहितीसाठी करू नये.