भारतात लाँच झाला Galaxy Z Flip 7, डिव्हाईसच्या कव्हर डिस्प्लेने वेधले लक्ष! तब्बल इतकी आहे किंमत; कधी सुरु होणार विक्री?
टेक कंपनी Samsung ने भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये Samsung Galaxy Z Flip 7 लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या डिव्हाईसची खासियत म्हणजेच त्याचा डिस्प्ले. या फोनमध्ये Exynos 2500 प्रोसेसर देण्यात आल आहे. अनफोल्ड केल्यानंतर Galaxy Z Flip 7 ची जाडी केवळ 6.5mm आहे, जो Galaxy Z Flip 6 च्या 6.9mm प्रोफाइलपेक्षा पातळ आहे. या डिव्हाईसची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि खास फीचर्स जाणून घेऊया.
Samsung Galaxy Z Flip 7 भारतात 109,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन शॅडो, कोरल रेड, जेट ब्लॅक, आणि मिंट शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही या स्मार्टफोनचा मिंट ऑप्शन केवळ Samsung India च्या वेबसाईटवरून खरेदी करू शकता. सर्व कलर ऑप्शन्स कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत आणि या स्मार्टफोनची विक्री 25 जुलैपासून सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – X)
Samsung Galaxy Z Flip 7 मध्ये 6.9-इंच फुल-HD+ Dynamic AMOLED 2X मेन फोल्डेबल डिस्प्ले आणि 4.1-इंच Super AMOLED कवर स्क्रीन देण्यात आली आहे. दोन्ही पॅनल्स 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 2,600 निट्स ब्राइटनेस ऑफर करतात. अनफोल्ड केल्यानंतर Galaxy Z Flip 7 ची जाडी केवळ 6.5mm आहे. Galaxy Z Flip 6 च्या तुलनेत या नवीन डिव्हाईसमध्ये री-डिजाइन कवर स्क्रीन देण्यात आली आहे. या फोनमध्ये 4.1-इंचाचा एज-टू-एज डिस्प्ले आहे, जो आधीच्या फोल्डर-आकाराच्या स्क्रीनची जागा घेतो.
आऊटर पॅनलमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 2 प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. हँडसेट इन-हाउस 3nm Exynos 2500 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हे डिव्हाईस 12GB रॅम आणि 512GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजला सपोर्ट करते. फोन Android 16-बेस्ड One UI 8 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी, Galaxy Z Flip 7 मध्ये दोन आउटवर्ड-फेसिंग कॅमेरे आहेत, ज्यामध्ये वाइड-अँगल लेंस आ्णि 2x ऑप्टिकल क्वालिटी झूमसह 50-मेगापिक्सेल मेन सेंसर आणि 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड शूटर आहे. मेन डिस्प्लेच्या टॉपवर 10-मेगापिक्सल सेल्फी शूटर आहे.
Galaxy Z Flip 7 मध्ये ProVisual Engine आहे, ज्यामध्ये युजर्ससाठी अनेक AI इमेजिंग आणि एडिटिंग टूल्स देण्यात आले आहेत. कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये ट्रांस्क्रिप्ट असिस्ट, नोट असिस्ट, कॉल असिस्ट आणि लाईव्ह ट्रांसलेशन सारखे अनेक AI फीचर्स देखील उपलब्ध आहेत. हे नवीन डिव्हाईस Google Gemini फीचर्स आणि Google च्या Circle to Search ला सपोर्ट करते. स्मार्टफोनच्या दूसऱ्या प्रोडक्टिविटी फीचर्समध्ये Now Bar आणि Now Brief यांचा समावेश आहे. स्मार्टफोनमधील Now Bar फीचर एक फ्लोटिंग बार आहे, जो म्यूझिक प्लेबॅक, लाईव्ह नोटिफिकेशन्स इत्यादी मॅनेज करण्यासाठी मदत करतो. तर या डिव्हाईसमधील Now Brief थेट कव्हर स्क्रीनवर दिवसाच्या प्लॅन्सचे पर्सनलाइज्ड रनडाउन देतो.
आळशी लोकांसाठी लाँच झालं नवीन गॅझेट! डिव्हाईस स्वत: मारणार झाडू आणि पुसणार लादी, केवळ इतकी आहे किंमत
Samsung ने Galaxy Z Flip 7 मध्ये 4,300mAh बॅटरी दिली आहे. या फ्लिप फोनमध्ये Armor Aluminium मिडल फ्रेम आणि Armor FlexHinge आहे. Galaxy Z Flip 7 मध्ये IP48 डस्ट आणि वाटर-रेसिस्टेंट बिल्ड आहे.