Samsung चा सर्वात पातळ Foldable Phone अखेर लाँच, 200MP कॅमेऱ्यासह असे आहेत कमाल फीचर्स, लाखोंच्या घरात आहे किंमत
Galaxy Unpacked Event: टेक कंपनी Samsung ने त्यांचा सर्वात मोठा ईव्हेंट सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड 2025 चे आयोजन केले होते. या ईव्हेंटमध्ये कंपनीने अनेक गॅझेट्स लाँच केले आहेत. यातीलच एक बहुप्रतिक्षित गॅझेट म्हणजे Galaxy Z Fold 7. या फोनची युजर्सना प्रतिक्षा होती, कारण हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात पातळ फोल्डेबल फोन आहे, असा दावा करण्यात आला आहे. हाच बहुप्रतिक्षित फोल्डेबल फोन कंपनीने या ईव्हेंटमध्ये सादर केला आहे. या डिव्हाईसमध्ये परफॉर्मंस, डिझाईनपासून कॅमेऱ्यापर्यंत सर्वकाही अपग्रेड करण्यात आलं आहे. या डिव्हाईसची किंमत लाखोंच्या घरात आहे. या फोनच्या फीचर्स, डिझाईन आणि किंमतीचा विचार केला तर सध्या हा अनेकांचा ड्रिम फोन आहे.(फोटो सौजन्य – X)
फोल्ड 6 सह तुलना केल्यास या नव्या फोनची डिझाईन बरीच स्लिम आहे. हा फोन अनफोल्ड केल्यानंतर त्याची जाडी केवळ 4.2 मिमी होते. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर डिव्हाईसमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. चला तर मग कंपनीने लाँच केलेल्या ऑल न्यू फोल्डेबल डिव्हाईसबद्दल जाणून घेऊया. या फोनचे फिचर्स काय आहेत, किंमत काय आहे, सर्वकाही सविस्तरपणे जाणून घेऊया.
आयोजित ईव्हेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या सर्वात पातळ Samsung Galaxy Z Fold 7 ची सुरुवातीची किंमत 174,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची विक्री भारतात कधी सुरु होणार, याबाबत अद्याप कोणीतीही माहिती देण्यात आली नाही.
Samsung ने गॅलेक्सी Z फोल्ड 7 ला अँड्रॉइड 16 वर बेस्ड वन UI 8 सह सादर केला आहे. डिव्हाईसमध्ये तुम्हाला डायनामिक AMOLED 2X इनफिनिटी फ्लेक्स डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. या नव्या डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,600 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. डिव्हाईसमध्ये 6.5-इंच फुल-HD+ डायनामिक AMOLED 2X कवर डिस्प्ले देण्यात आला आहे.
Samsung Galaxy Z Fold 7 मध्ये यावेळी पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 एलीट फॉर गॅलेक्सी चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच 16GB पर्यंत रॅम देखील आहे. कंपनीने सादर केलेल्या या नवीन डिव्हाईसमध्ये अनेक कमाल AI फीचर्स देखील आहेत, ज्यामध्ये जेमिनी लाइव, AI रिजल्ट्स व्यू, सर्कल टू सर्च, ड्रॉइंग असिस्ट आणि राइटिंग असिस्ट सारखे अनेक फीचर्स आहेत.
डिव्हाईसच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर कंपनीने Samsung Galaxy Z Fold 7 अनेक कॅमेरा अपग्रेडसह सादर केला आहे. यामध्ये ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये खास क्वाड पिक्सल ऑटोफोकस, OIS सपोर्ट आणि 85-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या नव्या डिव्हाईसमध्ये 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि 3x ऑप्टिकल झूमवाला 10-मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सेल्फी लवर्ससाठी या नव्या पातळ फोल्डेबल डिव्हाईसमध्ये कवर डिस्प्लेवर 10-मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि इंटरनल डिस्प्लेवर देखील 10-मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
या डिव्हाईसमध्ये 4,400mAh बॅटरी दिली आहे, जी 25W चार्जिंगला सपोर्ट करते.