OnePlus 15: OnePlus चा ‘छोटू' फ्लॅगशिप फोन लवकरच करणार एंट्री, तगडे फीचर्स आणि मिळणार 120W चार्जिंगचा सपोर्ट!
2025 हे स्मार्टफोनसाठी अत्यंत खास वर्ष ठरलं. कारण यावर्षी अनेक टेक कंपन्यांनी त्यांचे नवीन स्मार्टफोन्स लाँच केले. यातील काही स्मार्टफोन्स अत्यंत कमी किंमतीत म्हणजेच बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आले होते तर काही स्मार्टफोन्स प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आले. 2025 हे वर्ष संपण्यासाठी आणखी काही महिने शिल्लक आहे. अजूनही टेक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन्स लाँच करत आहेत. आता देखील आम्ही तुम्हाला अशाच एका स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, जे येत्या काहीच दिवसांत लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
स्मार्टफोन ब्रँड OnePlus लवकरच त्यांचा नवीन फ्लॅगशिप OnePlus 15 लाँच करण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, OnePlus 15 हा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन नोव्हेंबर महिन्यात लाँच केला जाणार आहे. सर्वात आधी हा स्मार्टफोन ग्लोबल लेव्हलवर लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच केला जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. असं सांगितलं जात आहे की, यावेळी OnePlus त्यांची पारंपरिक लाँच स्ट्रॅटेजीमध्ये काही बदल करू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
लीक्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, OnePlus 15 मध्ये 6.78-इंच BOE X3 AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे, 1.5K रेजॉल्यूशन आणि 165Hz वेरिएबल रिफ्रेश रेट सपोर्टसह येणार आहे. डिस्प्लेमध्ये Dolby Vision आणि Pro XDR सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 1800 निट्सपर्यंत असणार आहे. फोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट, LPDDR5X RAM आणि UFS 4.1 स्टोरेज दिले जाऊ शकते. हा आगामी स्मार्टफोन 12GB आणि 16GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. गेमिंग प्रेमींसाठी, यात Wind Chi Game Kernel 2.0 फीचर दिले जाऊ शकते, जे कामगिरी आणि थर्मल कंट्रोल सुधारेल.
OnePlus 15 मध्ये ट्रिपल 50MP कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये ट्रिपल 50MP कॅमेरा सेटअप असू शकतो. फोनमध्ये OIS सपोर्टसह Sony LYT-700 दिला जाऊ शकतो.
यावेळी OnePlus 15 मध्ये 7300mAh ची मोठी बॅटरी दिली जाणार आहे, जी120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.
डिझाइनच्या बाबतीत, हा फोन OnePlus 13 सीरीजसारखा असेल, परंतु मागील कॅमेरा मॉड्यूल बदलण्यात आला आहे. हा फोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये टायटॅनियम, काळा, जांभळा आणि एक नवीन सँड स्टॉर्म फिनिश यांचा समावेश असू शकतो.
रिपोर्ट्सनुसार, जागतिक स्तरावर लाँच 13 नोव्हेंबर 2025 रोजी होईल आणि भारतातही त्याच तारखेला लाँच होण्याची अपेक्षा आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, OnePlus 15 ची किंमत भारतात 65,000 ते 75,000 रुपयांदरम्यान असू शकते.