Diwali 2025: फक्त मिठाई नाही, या 4 स्मार्ट गिफ्ट्सने तुमच्या प्रियजनांची दिवाळी करा आणखी खास
सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. कारण दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. दिवाळीच्या सणानिमित्त लोकं एकमेकांना भेटवस्तू देतात. दरवर्षी आपण दिवाळीला आपल्या प्रियजनांना मिठाई आणि ड्राय फ्रूट्स देतो. पण आता आम्ही तुम्हाला अशा काही गिफ्ट्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे प्रियजन देखील खूश होणार आहेत. या चार भेटवस्तू केवळ दिसायलाच आकर्षक नाहीत तर त्या आरोग्य, आठवणी आणि स्मार्ट टेक्नोलॉजीचे सुंदर कॉम्बिनेशन आहे.
OnePlus ने लाँच केलं Android 16 बेस्ड OxygenOS 16, आता Apple प्रोडक्ट्सने कनेक्ट होणार डिव्हाईस
हे आजच्या काळात एक बेस्ट गिफ्ट ठरू शकते. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला असे काहीतरी द्यायचे असेल जे दैनंदिन जीवन निरोगी ठेवण्यासाठी मदत करेल, तर Elista Alkaline Water Purifiers एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. हे मेड इन इंडिया प्यूरिफायर मॉडर्न डिझाइनसह येतात आणि यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी मल्टी-स्टेज फिल्ट्रेशन, एक्टिव कॉपर एनरिचमेंट आणि मिनरल रिस्टोरेशन सारखे एडवांस टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांना फिटनेस संबंधित एखादे गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही Apple Watch SE 3 हा ऑप्शन निवडू शकता. हे डिव्हाईस परवडणाऱ्या किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. यामध्ये ऑलवेज-ऑन डिस्प्ले, स्लीप ट्रॅकिंग, टेम्परेचर सेन्सर आणि क्रॅश डिटेक्शन सारखे प्रीमियम वैशिष्ट देण्यात आले आहेत. नवीन S10 चिप याला स्मूद परफॉर्मेंस देतो. या डिव्हाईसमध्ये 18 तासांच्या बॅटरी लाइफसह फास्ट चार्जिंग देखील देण्यात आली आहे. 40mm आणि 44mm या दोन्ही आकारात हे घड्याळ उपलब्ध आहे. याची किंमत 25,900 रुपयांपासून सुरु होते.
सणासुदीच्या काळातील सुंदर आठवणी फोटोमध्ये कॅप्चर करण्यासाठी तुम्ही Fujifilm Instax Mini 12 ची निवड करू शकता. Fujifilm Instax Mini 12 तुम्हाला लगेचच फिजिकल फोटो प्रिंट करण्याची संधी देतो. ज्यामुळे तुम्ही तुमच्या दिवाळी पार्टी किंवा कुटुंबाच्या फोटोशूटच्या आठवणी कॅप्चर करून ठेऊ शकता. याचे ट्विस्ट-टू-ओपन लेंस, ऑटो एक्सपोजर आणि क्लोज-अप मोड लहान मुलं आणि मोठी माणसं दोन्हींसाठी मजेदार आहे. पेस्टल शेड्समध्ये उपलब्ध असलेला हा कॅमेरा प्रत्येक पीढीला आवडणार आहे. 6,299 रुपयांच्या किमतीची ही एक छोटी पण भावनिक भेट आहे.
जर तुमचे मित्र किंवा कुटूंबातील कोणी ऑडियोफाइल आहे, तर त्यांना OnePlus Buds Pro 3 नक्कीच आवडेल. Dynaudioसह को-इंजीनियर्ड हे ईयरबड्स डुअल ड्राइवर्स आणि 50 dB पर्यंत एडॅप्टिव नॉइस कँसलेशनफीचर्स ऑफर करतात. याची बॅटरी लाईफ देखील कमाल आहे. या ईअरबड्सची किंमत केवळ 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे.