Google Pixel 10 खरेदी करण्याचा गोल्डन चान्स, स्मार्टफोन पहिल्यांदाच झाला इतका स्वस्त! असा घ्या ऑफरचा फायदा
दिवाळीत नवीन स्मार्टफोन खरेदी करणं फायद्याची डिल ठरते. कारण दिवाळीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही ठिकाणी स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जातं. त्यामुळे महागडे स्मार्टफोन देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळते. त्यामुळे सहसा लोकं दिवाळीत स्मार्टफोन आणि इतर गॅझेट्स खरेदी करण्याला प्राधान्य देतात. यंदाच्या दिवाळीत तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? तर Google Pixel 10 तुमच्यासाठी बेस्ट डिव्हाईस ठरू शकतं. कारण हा स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला असून आता त्याच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.
धनत्रयोदशीला खरेदी केलेले सोनं खरं की बनावट? आता 2 मिनिटांत ऑनलाइन तपासा, जाणून घ्या कसं
कंपनीने अलीकडेच Google Pixel 10 हा स्मार्टफोन लाँच केला होता. आता हा स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Amazon वर या स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे जे युजर्स फ्लॅगशिप स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी ही बेस्ट ऑफर आहे. ज्यांना नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी हि डिल योग्य आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Amazon वर Google Pixel 10 ची किंमत 12 हजार रुपयांनी कमी झाली आहे. म्हणजेच ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 12 हजार रुपयांची बचत करण्यााची संधी मिळणार आहे. हा स्मार्टफोन भारतात 79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता Amazon वर या स्मार्टफोनचा Lemongrass, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंट 67,130 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Amazon वर Google Pixel 10 चा Lemongrass, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंट 12,869 रुपयांच्या फ्लॅट डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, HDFC बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड EMI ट्रांजेक्शनवर 1,250 रुपयांचे एक्स्ट्रा डिस्काउंट देखील मिळणार आहे. यासोबतच, जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्हाला आणखी बचत करण्याची संधी मिळणार आहे.
Google Pixel 10 या स्मार्टफोनमध्ये 6.3-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 निट्सची पीक ब्राइटनेस सपोर्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेला सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 से प्रोटेक्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये Tensor G5 चिपसेट आहे, ज्यासोबत 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,970mAh बॅटरी देण्यात आली आहे, 30W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
फोटोग्राफीसाठी Google Pixel 10 मध्ये 48MP चा मुख्य सेंसर मॅक्रो फोकस देण्यात आला आहे. यासोबतच 13MP चा अल्ट्रा-वाइड लेंस आणि 10.8MP चा टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे, जो 5x ऑप्टिकल झूम सपोर्टसह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 10.5MP फ्रंट कॅमेरा आहे.