आयफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी! iOS 18.4 beta 2 रिलीज; Apple Vision Pro अॅप आणि नवीन इमोजी फीचर्स मिळणार
टेक जायंट अॅपलने iOS 18.4 चे दुसरे बीटा व्हर्जन रिलीज केले आहे. सुमारे एका आठवड्यापूर्वीच iOS 18.4 चे पहिले बीटा व्हर्जन रिलीज करण्यात आले होते. मात्र आता कंपनीने या अपडेटचे दुसरे बीटा व्हर्जन iOS 18.4 beta 2 रिलीज केलं आहे. या अपडेटमध्ये युजर्सना अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. नवीनतम iOS बीटा अपडेट रोलआउटवरून असे दिसून येते की कंपनी एप्रिलमध्ये रोलआउट होण्यापूर्वी नवीन वैशिष्ट्यांची चाचणी घेत आहे. ज्यामुळे युजर्सना नवीन OS 18.4 बीटा 2 अपडेट वापरताना अधिक चांगला अनुभव येणार आहे.
BGMI Pro Tips: तुम्हालाही गेमप्ले सुधारून PUBG चा प्रो प्लेअर व्हायचंय? आत्ताच करा या 5 ढासू सेटिंग
iOS 18.4 बीटा 2 सध्या फक्त चाचणीसाठी उपलब्ध आहे. या अपडेटमुळे आयफोन युजर्सना अनेक नवीन वैशिष्ट्ये मिळतील. अॅपलने अद्याप त्याचा सार्वजनिक बीटा रिलीज केलेला नाही. परंतु, अशी अपेक्षा आहे की ते या आठवड्यातच लाँच केले जाऊ शकते. या अपडेटचा बिल्ड नंबर 22E5216h आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
iOS 18.4 बीटा 2 मधील सर्वात हायलाइट केलेल्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाले तर, हे वैशिष्ट्य म्हणजे आयफोन 15 प्रो मॉडेल्सना मिळणारे व्हिज्युअल इंटेलिजेंस. Apple ने प्रथम हे वैशिष्ट्य iPhone 16 सिरीजसाठी जारी केले होते, जे आता iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max साठी देखील उपलब्ध असेल. कॅमेरा कंट्रोल बटणावरून व्हिज्युअल इंटेलिजेंस फीचर अॅक्सेस करता येते. कंपनीचे म्हणणे आहे की या फीचरमुळे कॅमेऱ्याची गुणवत्ता अनेक पटींनी वाढणार आहे. यामुळे फोटोग्राफी करताना युजर्सना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. फोटो पूर्वीपैक्षा अधिक चांगले येतील.
iOS 18.4 बीटा 1 मध्ये, कंपनीने प्रायोरिटी नोटिफिकेशन फीचर सादर केले. AI च्या मदतीने, ते महत्त्वाच्या नोटिफिकेशनना प्राधान्याने कस्टमाइझ करते. आता नवीन बीटासह, युजर्स कोणत्या अॅपच्या नोटिफिकेशनना प्राधान्य द्यायचे हे ठरवू शकतील. यासाठी, सेटिंग्ज अॅपमध्ये एक नवीन पर्याय जोडण्यात आला आहे, जिथून युजर्स निवडलेल्या अॅपच्या नोटिफिकेशन निवडू शकतील.
अॅपलने कंट्रोल सेंटरसाठी एक अपडेट जारी केले आहे. हे विशेषतः सिरी आणि अॅपल इंटेलिजेंस वैशिष्ट्यांसाठी आहे. अपडेटनंतर, iPhone 15 Pro आणि iPhone 16 सीरीजसाठी टॉक टू सिरी आणि व्हिज्युअल इंटेलिजेंससाठी टॉगल उपलब्ध असतील. यासोबतच, iOS 18.1 सह दिलेला Type to Siri टॉगल देखील कायम ठेवण्यात आला आहे.
iOS 18.4 सह, आयफोन वापरकर्त्यांना नवीन Apple Vision Pro अॅप देखील मिळेल. हे अॅप व्हिजन प्रो वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा जास्त कंटेट एक्सप्लोर करण्यास अनुमती देईल आणि त्यांना डिव्हाइसचा अधिक चांगला वापर करण्यासाठी टिप्स देखील देईल.
Holil 2025: होळी खेळताना अशी घ्या तुमच्या स्मार्टफोनची काळजी! रंग आणि पाणी दोन्हीपासून ठेवा सुरक्षित
अॅपलने iOS 18.4 च्या दुसऱ्या बीटा आवृत्तीमध्ये नवीन इमोजी देखील समाविष्ट केले आहेत. या इमोजींमध्ये रूट वेजिटेबल, फेस, शोवेल, हार्प, स्पलेटर, लीफलेस ट्री आणि फिंगरप्रिंट यांचा समावेश आहे. यासोबतच शार्क फ्लॅग आणि सीरियाचा फ्लॅग देखील अपडेट करण्यात आला आहे.