Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google चा गेम-चेंजर अपडेट! अकाऊंट अ‍ॅक्सेस न गमावता बदलू शकता ई-मेल अ‍ॅड्रेस, यूजर्सना असा होणार फायदा

जिमेल यूजर्ससाठी एक महत्त्वाचे अपडेट जारी करण्यात आले आहे. जिमेल यूजर्स आता अकाऊंटचा अ‍ॅक्सेस गमाविल्याशिवाय त्यांचा जिमेल अ‍ॅड्रेस बदलू शकणार आहेत. याची माहिती कंपनीच्या सपोर्ट पेजवर देखील देण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 28, 2025 | 09:05 AM
Google चा गेम-चेंजर अपडेट! अकाऊंट अ‍ॅक्सेस न गमावता बदलू शकता ई-मेल अ‍ॅड्रेस, यूजर्सना असा होणार फायदा

Google चा गेम-चेंजर अपडेट! अकाऊंट अ‍ॅक्सेस न गमावता बदलू शकता ई-मेल अ‍ॅड्रेस, यूजर्सना असा होणार फायदा

Follow Us
Close
Follow Us:
  • अकाऊंट लॉक न होता Gmail यूजर्सना बदलता येणार ई-मेल अ‍ॅड्रेस
  • Gmail मध्ये येतोय मोठा बदल, यूजर्सना होणार मोठा फायदा
  • Gmail यूजर्ससाठी ई-मेल बदलण्याची नवी पद्धत जारी
टेक कंपनी गुगल एक मोठा बदल करण्याच्या तयार आहे आणि याचा परिणाम लाखो युजर्सवर होणार आहे. हा परिणाम निश्चितच चांगल्या पद्धतीचा असेल. माउंटेन व्यू-बेस्ड टेक दिग्गजने त्यांचे सपोर्ट पेज अपडेट केले आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की, यूजर्स त्यांच्या अकाऊंटचा अ‍ॅक्सेस गमावल्याशिवाय त्यांचा जीमेल अ‍ॅड्रेस बदलू शकणार आहे. ई-मेल आयडीचा पहिला भाग म्हणजेच @gmail.com च्या आधी असणारा भाग आता बदलू शकणार आहेत. या बदलानंतर देखील युजर्सचे गुगल अकाऊंट तसेच राहणार आहे. म्हणजेच त्यामधील कॉन्टॅक्ट, ड्राइव्ह फाईल्स, ई-मेल आणि फोटो यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

Gmail अ‍ॅड्रेस बदलला जाऊ शकतो

आतापर्यंत गुगल युजर्सना अशावेळी ई-मेल अ‍ॅड्रेस बदलण्याची परवानगी द्यायचा, जेव्हा ते एखाद्या थर्ड पार्टी इमेलचा वापर करत असतील. जर युजरचा ई-मेल अ‍ॅड्रेस @gmail.com वरच संपत असेल तर त्यांच्याकडे जुना अ‍ॅड्रेस डिलीट करून नवीन जीमेल अ‍ॅड्रेस बदलण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मात्र आता ही सर्व्हिस बदलणार आहे. असं सांगितलं जात आहे की, गुगल हळूहळू नवीन अपडेट रोल आऊट करत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये झाली Moco Store ची एंट्री, फ्रीमध्ये क्लेम करा जिंजरब्रेड मॅन बंडल

सपोर्ट पेज केले अपडेट

कंपनीने युजर्सना आगामी बदलाबाबत सांगण्यासाठी त्यांचे सपोर्ट पेज देखील अपडेट केले आहे. यामध्ये सांगितलं आहे की, युजर्स एक नवीन Gmail अ‍ॅड्रेस निवडू शकणार आहे. हे अपडेट सर्व यूजरसाठी टप्प्याटप्प्याने रोल आउट केलं जात आहे. युजर्स गुगल अकाऊंट सेटिंग्समध्ये जाऊन नवीन अपडेटचा वापर करू शकणार आहेत. सपोर्ट पेजवर सांगण्यात आलं आहे की, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या गुगल अकाऊंटचा ईमेल ॲड्रेस जो gmail.com वर संपतो, तो बदलून एक नवीन ईमेल ॲड्रेस तयार करू शकता जो gmail.com संपेल.

सध्या उपलब्ध असलेला Gmail ॲड्रेस एक उपनाव म्हणून उपलब्ध

जर एखाद्या यूजरने नवीन Gmail ॲड्रेस निवडला तर त्याचा सध्या उपलब्ध असलेला Gmail ॲड्रेस एक उपनाव म्हणून उपलब्ध असणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, सर्व संपर्क, ड्राइव्ह फाईल्स, ईमेल, फोटो, परचेज आणि सब्सक्रिप्शन यामध्ये कोणताही बदल होणार नाही. जुना ईमेल ॲड्रेस सुरू राहणार आहे आणि त्यावर पाठवलेले ईमेल इनबॉक्समध्ये येणार आहेत. युजर्स नव्या किंवा जुन्या ईमेल ॲड्रेसचा वापर साइन इन करुन करू शकणार आहेत.

राक्षसी बॅटरीसह लाँच झाले हे स्मार्टफोन्स! 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6.83-इंच डिस्प्ले… जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

3 वेळा बदलला जाऊ शकतो जीमेल ॲड्रेस

जीमेल, ड्राइव्ह, यूट्यूब आणि मॅप्स सारख्या सर्विसेजसाठी उपलब्ध साइन-इन ॲक्सेसवर कोणताही परिणाम होणार नाही. सपोर्ट पेजमध्ये बरीच महत्त्वाची माहिती सांगण्यात आली आहे. त्यामुळे Gmail ॲड्रेस बदलण्याची ही प्रक्रिया कशी काम करणार आहे, याबाबत युजर्स सविस्तरपणे जाणून घेऊ शकतात. सर्वात आधी युजर्स प्रत्येक 12 महिन्यात एकदा त्यांचा जीमेल ॲड्रेस बदलू शकणार आहे. हा ॲड्रेस एकूण 3 वेळा बदलला जाऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की, युजर्सना अकाऊंसाठी एकूण 4 जीमेल ॲड्रेस मिळणार आहेत. तुमचा जुना ईमेल ॲड्रेस देखील अकाउंटला जोडला जाणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Gmail अकाऊंट कसं तयार करायचं?

    Ans: Google Sign Up पेजवर जाऊन अकाऊंट तयार करता येतं.

  • Que: Gmail मध्ये ई-मेल अ‍ॅड्रेस बदलता येतो का?

    Ans: हो, काही परिस्थितीत Google ही सुविधा देतो.

  • Que: Gmail अकाऊंट हॅक झालं तर काय करावं?

    Ans: ताबडतोब पासवर्ड बदला आणि Account Recovery वापरा.

Web Title: Google is planning to release new update users can change their email address without losing account access tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 09:05 AM

Topics:  

  • gmail
  • google
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये झाली Moco Store ची एंट्री, फ्रीमध्ये क्लेम करा जिंजरब्रेड मॅन बंडल
1

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये झाली Moco Store ची एंट्री, फ्रीमध्ये क्लेम करा जिंजरब्रेड मॅन बंडल

Tech Tips: हिवाळ्यात गिझर बनू शकतो टाईमबॉम्ब! एक छोटी चूक आणि होऊ शकतो मोठा धमाका, असं राहा सुरक्षित
2

Tech Tips: हिवाळ्यात गिझर बनू शकतो टाईमबॉम्ब! एक छोटी चूक आणि होऊ शकतो मोठा धमाका, असं राहा सुरक्षित

Raigad News: महाडमध्ये इतिहास घडला! पहिले ‘AI सेंटर’ सुरू, तालुक्याला मिळाली टेक्नॉलॉजीची नवी ओळख
3

Raigad News: महाडमध्ये इतिहास घडला! पहिले ‘AI सेंटर’ सुरू, तालुक्याला मिळाली टेक्नॉलॉजीची नवी ओळख

John Cena फॅन्ससाठी अनोखं सरप्राईज! Google वर नाव टाइप करताच स्क्रीनवर दिसेल खास इफेक्ट, आत्ताच करा ट्राय
4

John Cena फॅन्ससाठी अनोखं सरप्राईज! Google वर नाव टाइप करताच स्क्रीनवर दिसेल खास इफेक्ट, आत्ताच करा ट्राय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.