Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Pay झाले आणखी स्मार्ट! आता ‘Ask Google Pay’ AI फीचर ठेवणार तुमच्या खर्चाचा हिशोब, यूजर्सना असा होणार फायदा

भारतात डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असताना Google Pay ने आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये आणखी एक मोठे AI अपडेट आणले आहे. जेमिनी एआयवर आधारित 'आस्क गूगल पे' फीचरमुळे आता यूजर्सना खर्चाचे विश्लेषण, आर्थिक संकल्पनांचे सोपे स्पष्टीकरण आणि वैयक्तिक आर्थिक सल्ला एका क्लिकमध्ये मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 01, 2026 | 01:56 PM
Google Pay झाले आणखी स्मार्ट! आता 'Ask Google Pay' AI फीचर ठेवणार तुमच्या खर्चाचा हिशोब, यूजर्सना असा होणार फायदा

Google Pay झाले आणखी स्मार्ट! आता 'Ask Google Pay' AI फीचर ठेवणार तुमच्या खर्चाचा हिशोब, यूजर्सना असा होणार फायदा

Follow Us
Follow Us:
  • गुगल पे मध्ये Gemini AI वर आधारित ‘Ask Google Pay’ फीचर लॉन्च करण्यात आले असून ते यूजर्सच्या खर्चाचे स्मार्ट विश्लेषण करणार आहे.
  • हे AI चॅटबॉट खर्चाचा पाय चार्ट, व्यवहारांचे वर्गीकरण आणि आर्थिक सवयी सुधारण्यासाठी वैयक्तिक सूचना देणार आहे.
  • गुगलने एसबीआय कार्ड सोबत भागीदारी करून भारतात गुगल पे फ्लेक्स एसबीआय कार्ड देखील लॉन्च केला आहे.
भारतात ऑनलाईन पेमेंटची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बरेच लोकं ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी गूगल पेचा वापर करतात. भारतात लाँच करण्यात आल्यापासून आतापर्यंत गूगल पे ला अनेक अपडेट्स मिळाले आहेत. यामुळे हे डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या यूजर्सचा अनुभव दिवसेंदिवस आणखी चांगला होत आहे. आता देखील गूगल पे साठी एक नवीन फीचर लाँच करण्यात आले आहे.

स्मार्टफोनच्या दुनियेत नवा अध्याय! 0mm डिस्प्ले बॉर्डरसह Tecno चा कॉन्सेप्ट फोन; IFA 2026 मध्ये होणार मोठा धमाका

जेमिनी-पावर्ड AI चॅटबोट

अलीकडेच कंपनीने गूगल पे साठी आस्क गूगल पे नावाने एक जेमिनी-पावर्ड AI चॅटबोट लाँच केला आहे. यामुळे यूजर्सना एक नवीन संवादात्मक अनुभव मिळणार आहे. हे आस्क गूगल पे AI चॅटबोट यूजरच्या खर्चाच्या सवयीवर आधारित प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सक्षम आहे. यामुळे यूजर्स त्यांच्या खर्चाचे विश्लेषण करू शकतात. याशिवाय गूगलने भारतात RuPay नेटवर्कवर आधारित गुगल पे ने फ्लेक्स एसबीआय कार्ड लाँच करण्यासाठी एसबीआय कार्डसोबत पार्टनरशिप करण्याची घोषणा केली आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

आस्क गूगल पे लाँचिंगची घोषणा

गेल्या आठवड्यात शेअर करण्यात आलेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये कंपनीने आस्क गूगल पे लाँचिंगची घोषणा केली आहे. हे गूगलच्या जेमिनी एआय मॉडेल्सद्वारे समर्थित एक डेडिकेटेड AI चॅटबॉट आहे. हे एक ऑप्ट-इन फीचर आहे, याचा अर्थ असा आहे की, हे चॅटबोट वापरण्यासाठी यूजर्सना चॅटबोटला स्वत:हून सक्षम करावे लागणार आहे. आस्क गूगल पे च्या मदतीने यूजर्स त्यांच्या खर्चाचे विश्लेषण करण्यास सांगू शकतात. यामुळे यूजर्सना त्यांच्या खर्चाची सवय आणखी चांगल्या पद्धतीने ट्रॅक करण्यासाठी मदत होणार आहे. हे फीचर ॲक्सेस करण्यासाठी यूजर्सना गूगल पे मध्ये पपर्सनलायझेशन चालू करावे लागणार आहे.

उदाहरणार्थ, एखादा यूजर आस्क गूगल पे चॅटबोटकडून त्याच्या गेल्या महिन्याच्या खर्चाच हिशोब मागू शकतो. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एआय चॅटबोट डेटा काढून पाय चार्टच्या स्वरूपात दाखवेल, व्यवहारांची श्रेणीनुसार यादी करेल आणि खर्चाच्या सवयी सुधारण्यासाठी टिप्स देईल. याप्रमाणे, आस्क गूगल पे यूजरच्या सवयींनुसार, टेलर्ड ऑफर्स आणि क्रेडिट कार्ड ऑप्शन्स देखील शोधू शकणार आहेत. हे कम्पाउंडिंग इंटरेस्ट जसे फाइनेंशियल टर्म्स अगदी सोप्या भाषेत समजावून सांगू शकणार आहे आणि यावरून कर प्रणालींमधील फरकही स्पष्ट होऊ शकतो.

Upcoming Smartphones: Pixel 11 पासून Vivo V80 पर्यंत… ऑगस्टमध्ये या कंपन्या करणार लाँच करणार नवीन स्मार्टफोन्स

गूगलने पुढे सांगितलं आहे की, आस्क गूगल पे यूजर्सना एसआयपी आणि क्रेडिट स्कोर सारख्या फाइनेंशियल कॉन्सेप्ट्स समजवण्यासाठी देखील मदत करणार आहे. प्रश्नांची उत्तर देताना हे चॅटबोट यूजरच्या ट्रांजेक्शन हिस्ट्री आणि क्रेडिट रिपोर्ट डेटाचा रेफरेंस घेऊ शकतो, ज्यामुळे पर्सनल रिकमेंडेशन्स आणि सल्ला देऊ शकतात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे एआय चॅटबोट 10 भारतीय भाषांमध्ये यूजर्सचे प्रश्न समजून उत्तरं देऊ शकतो. याचा वापर करण्यासाठी टेक्स्ट आणि वॉयस कमांड्स दोन्हीचा सपोर्ट मिळणार आहे.

Web Title: Google pay launches gemini powered ask google pay ai chatbot and flex sbi card in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • google pay
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

स्मार्टफोनच्या दुनियेत नवा अध्याय! 0mm डिस्प्ले बॉर्डरसह Tecno चा कॉन्सेप्ट फोन; IFA 2026 मध्ये होणार मोठा धमाका
1

स्मार्टफोनच्या दुनियेत नवा अध्याय! 0mm डिस्प्ले बॉर्डरसह Tecno चा कॉन्सेप्ट फोन; IFA 2026 मध्ये होणार मोठा धमाका

पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ हटवल्यानंतर Meta चा मोठा निर्णय! VIP अकाउंट्ससाठी जारी केले नवीन नियम; वाचा सविस्तर
2

पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ हटवल्यानंतर Meta चा मोठा निर्णय! VIP अकाउंट्ससाठी जारी केले नवीन नियम; वाचा सविस्तर

सॅटेलाईटमधून थेट फोनमध्ये मिळणार सिग्नल! काय आहे Amazon ची D2D सर्विस? जाणून घ्या सविस्तर
3

सॅटेलाईटमधून थेट फोनमध्ये मिळणार सिग्नल! काय आहे Amazon ची D2D सर्विस? जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: पावसाळ्यात इन्व्हर्टर-बॅटरीची कशी कराल योग्य देखभाल? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
4

Tech Tips: पावसाळ्यात इन्व्हर्टर-बॅटरीची कशी कराल योग्य देखभाल? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.