Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Pixel 11 सिरीज लवकरच येणार; Tensor G6 चिप आणि दमदार फीचर्सने असणार सुसज्ज, जाणून घ्या सविस्तर

गुगल लवकरच आपली नवीन पिक्सेल 11 सिरीज लाँच करण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्सनुसार या सिरीजमध्ये गुगल पिक्सेल 11 प्रो आणि पिक्सेल 11 प्रो एक्सएल दमदार फीचर्स आणि AI अपग्रेड्स दिले जाऊ शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 05, 2026 | 08:45 PM
Google Pixel 11 सिरीज लवकरच येणार; Tensor G6 चिप आणि दमदार फीचर्सने असणार सुसज्ज, जाणून घ्या सविस्तर

Google Pixel 11 सिरीज लवकरच येणार; Tensor G6 चिप आणि दमदार फीचर्सने असणार सुसज्ज, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • पिक्सेल 11 प्रो आणि प्रो एक्सएल मध्ये 2nm प्रोसेसवर आधारित नवीन Tensor G6 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे.
  • या सिरीजमध्ये ‘पिक्सेल ग्लो’ नावाचे LED नोटिफिकेशन फीचर दिले जाऊ शकते.
  • दोन्ही फोनमध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा आणि 16GB पर्यंत रॅमसह प्रीमियम स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात.
टेक आणि स्मार्टफोन कंपनी गुगल लवकरच नवीन पिक्सेल सिरीज लाँच करण्याची योजना आखत आहे. कंपनीची नवीन स्मार्टफोन सिरीज पिक्सेल 11 या नावाने लाँच केली जाण्याची शक्यता आहे. कंपनीच्या आगामी स्मार्टफोन सिरीजबाबत आता काही रिपोर्ट्स समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी त्यांच्या आगामी सिरीजमध्ये Pixel 11 Pro आणि Pixel 11 Pro XL हे स्मार्टफोन लाँच करण्याची योजना आखत आहे. यावेळी सिरीजमधील हे दोन्ही स्मार्टफोन्स खास फीचर्ससह लाँच केले जाणार आहेत. याच फीचर्सबाबत काही माहिती समोर आली आहे.

Jio Recharge Plan: यूजर्सना धक्का! कंपनीने बंद केला हा स्वस्त प्लॅन; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

गुगल पिक्सेल 11 प्रो, पिक्सेल 11 प्रो एक्सएल मध्ये काय असणार खास?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर टिपस्टर Rincon de Mellis ने कथित गुगल पिक्सेल 11 प्रो आणि पिक्सेल 11 प्रो एक्सएल चे काही डिटेल्स शेअर केले आहेत. यावेळी कंपनीच्या फोनमध्ये काही सामान्य बदल पाहायला मिळू शकतात, ज्यामध्ये पूर्णपणे ब्लॅक कॅमेरा मॉड्यूल मिळण्याची शक्यता आहे. तथापी, यावेळी दोन्ही डिव्हाईसमध्ये नवीन Tensor G6 चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे, ज्याला 2nm प्रोसेसवर तयार करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या 3एनएम-आधारित टेन्सर जी5 प्रोसेसरच्या तुलनेत, 2एनएम प्रक्रियेमुळे परफॉर्मंस आणि कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)

स्मार्टफोन्समध्ये मिळणार खास पिक्सेल ग्लो

पिक्सेल 11 सिरीजमधील एक खास गोष्ट म्हणजे पिक्सेल ग्लो. आगामी सिरीजमध्ये पिक्सेल ग्लो हे एक नवीन एलईडी नोटिफिकेशन लाईट फीचर असणार आहे. यामुळे डिव्हाईसची मागील बाजू उजळू शकते. पिक्सेल 11 सिरीजमधील हे फीचर ‘नथिंग’च्या ‘ग्लिफ लाईट्स’सारखे असल्याचे म्हटले जात आहे.

गुगल पिक्सेल 11 प्रो, पिक्सेल 11 प्रो एक्सएल डिस्प्ले

मिळालेल्या माहितीनुसार, गुगल पिक्सेल 11 प्रो मध्ये 6.3-इंच LTPO डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. तर पिक्सेल 11 प्रो एक्सएल मध्ये 6.8-इंच डिस्प्ले मिळू शकतो. यासोबतच दोन्ही डिव्हाईसमध्ये सॅमसंगचा नवीन M16 OLED पॅनल मिळू शकतो. एवढंच नाही तर दोन्ही डिव्हाईसमध्ये अंडर-डिस्प्ले फेस आयडी देखील मिळण्याची शक्यता आहे. नेहमीच्या फेस अनलॉकच्या विपरीत, यामध्ये ॲपलच्या फेस आयडीसारखी प्रणाली वापरली जाऊ शकते.

Xiaomi चाहत्यांना धक्का! कंपनी ‘या’ फोल्डेबल फोनला करणार ‘Good Bye’? कारण काय? जाणून घ्या

गुगल पिक्सेल 11 प्रो, पिक्सेल 11 प्रो एक्सएल कॅमेरा

यावेळी गुगल पिक्सेल 11 प्रो आणि पिक्सेल 11 प्रो एक्सएल मध्ये गेल्या वर्षीप्रमाणेच कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये एक 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 48-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि एक 48-मेगापिक्सेलचे 5x टेलीफोटो लेंस मिळू शकते. दोन्ही मॉडेल्समध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पासून सुरू होऊन 1TB पर्यंतचे बेस स्टोरेज असेल. गूगल या वर्षी ऑगस्टमध्ये पिक्सेल 11 सिरीज सादर करेल अशी अपेक्षा आहे.

Web Title: Google pixel 11 series leaks tensor g6 chip pixel glow feature and premium specs expected tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • google
  • google pixel
  • smartphone

संबंधित बातम्या

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral
1

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral

Market Crash: फक्त ‘या’ दोघांनी नोकरी बदलली अन् जगभरातील शेअर बाजार पत्त्यांसारखे कोसळले; टेक कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्स पाण्यात
2

Market Crash: फक्त ‘या’ दोघांनी नोकरी बदलली अन् जगभरातील शेअर बाजार पत्त्यांसारखे कोसळले; टेक कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्स पाण्यात

नव्या Samsung स्मार्टफोनने भारतात घातलाय धुमाकूळ! मोठी बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज… ‘या’ दिवशी सुरू होणार विक्री
3

नव्या Samsung स्मार्टफोनने भारतात घातलाय धुमाकूळ! मोठी बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज… ‘या’ दिवशी सुरू होणार विक्री

Earthquake Alert : भूकंपापूर्वीच मोबाईल करेल सावध! या खास फिचरमुळे काही सेकंद आधी मिळतो अलर्ट
4

Earthquake Alert : भूकंपापूर्वीच मोबाईल करेल सावध! या खास फिचरमुळे काही सेकंद आधी मिळतो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.