Pixel 9a: स्वस्त iPhone ला टक्कर द्यायला आलाय Google चा सुपर स्मार्टफोन; हटके फिचर्स आणि तुमच्या खिशाला परवडणारी किंमत
काही दिवसांपूर्वी टेक जायंट कंपनी Apple ने त्यांचा स्वस्त iPhone 16e लाँच केला होता. आता या स्वस्त iPhone ला टक्कर देण्यासाठी स्मार्टफोन कंपनी Google ने त्यांचा नवीन फोन लाँच केला आहे. Google चा हा नवीन स्मार्टफोन Google Pixel 9a या नावाने लाँच करण्यात आला आहे. गुगलचा हा परवडणारा फोन कंपनीच्या फ्लॅगशिप Google Pixel 9 लाइनअपचा भाग असेल. गुगलच्या या लेटेस्ट स्मार्टफोनची डिझाईन Google Pixel 9 सारखी आहे, ज्यामध्ये कंपनीने काही बदल केले आहेत. नवीन फोन 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि गुगलच्या Tensor G4 प्रोसेसरसह बाजारात लाँच करण्यात आला आहे.
गुगलचा नवीनतम Google Pixel 9a स्मार्टफोन 49,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह बाजारात लाँच करण्यात आला आहे. कंपनी या स्मार्टफोनचा आणखी एक व्हेरियंट लाँच करणार आहे, ज्यामध्ये 256GB स्टोरेज असेल. हा फोन फ्लिपकार्टवर विकला जाईल. (फोटो सौजन्य – X)
Google Pixel 9a स्मार्टफोन भारतात iPhone 16e शी थेट स्पर्धा करणार आहे. iPhone 16e भारतात 59,900 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. स्वस्त iPhone नंतर आता Google चा परवडणारा फोन देखील बाजारात आला आहे.
Get ready to meet the Google #Pixel9a… soon! 😋
From:
📸 Wow-worthy camera & editing ✨
🏖️ Water resistance + all-day battery life 🔋
🎊 That new phone feeling, again & again!
👩💻 Your AI bestie, Gemini
🦺 Protection? Covered – online & IRL!…and so much more! We can’t stop… pic.twitter.com/MbIHPjsTRB
— Google India (@GoogleIndia) March 20, 2025
डिस्प्ले: Google Pixel 9a स्मार्टफोनमध्ये 6.3 इंचाचा Actua pOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2424×1080 पिक्सेल आहे आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. या डिस्प्लेमध्ये HDR सपोर्ट आणि Gorilla Glass 3 प्रोटेक्शन आहे.
प्रोसेसर: गुगलच्या नवीनतम परवडणाऱ्या फोनमध्ये कंपनीचा टेन्सर G4 चिपसेट आहे. हाच चिपसेट फ्लॅगशिप Pixel 9 सिरीजमध्ये देखील उपलब्ध असेल. यासोबतच फोनमध्ये टायटन M2 सुरक्षा चिप देखील उपलब्ध असेल. हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज पर्यायांसह लाँच करण्यात आला आहे.
कॅमेरा: Pixel 9a स्मार्टफोनमध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ला सपोर्ट करतो. हा फोन 13 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. या गुगल फोनमध्ये Add Me, Face Unblur, Magic Editor आणि Eraser सारखे अनेक कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत.
बॅटरी: गूगलच्या या नवीन सुपर स्मार्टफोनमध्ये 5100mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 33W वायर्ड आणि 7.5W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते.
इतर वैशिष्ट्ये: हा फोन अँड्रॉइड 15 वर चालेल, ज्याला 7 वर्षांसाठी अपडेट्स मिळतील. हा फोन IP68 रेटिंग, स्टीरियो स्पीकर, Car Crash Detection, Wi-Fi 6E, NFC, आणि eSIM सपोर्टसह येतो.